खरवडला सात वर्षांपासून पाणी पुरवतोय शेतकरी

नळ कनेक्शनद्वारे ३६० घरांना केला जातोय पाणीपुरवठा
खरवडला सात वर्षांपासून पाणी पुरवतोय शेतकरी
Drinking WaterAgrowon

तळोदा, जि. नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) गावातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा (Water Shortage) सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रकाश शिरसाट (Prakash Shirsat) हे पुढे आले असून, गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागवत (Water Supply) आहे. त्यामुळे प्रकाश शिरसाट यांच्या या दातृत्वाची पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

खरवडची (ता. तळोदा) लोकसंख्या जवळपास एक हजार तीनशे असून गावाला काही वर्षांपूर्वी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन सरपंच जिजाबाई मोरे यांनी गावासाठी चार कूपनलिका मंजूर केल्या होत्या, परंतु त्यापैकी दोन कूपनलिकांना पाणी लागले. त्या कूपनलिकांमध्ये नियमित वापरल्या जाणाऱ्या अश्‍वशक्तीचा विद्युत पंप टाकून गावातील घरापर्यंत पाणी पोहोचविण्यात आले. कालांतराने कूपनलिकांमधील पाण्याची पातळी खोल गेल्याने पुन्हा पाण्याची समस्या निर्माण झाली. त्याला पर्याय म्हणून कूपनलिकांमध्ये सिंगल फेज विद्युतपंप टाकण्यात आले व त्या सिंगल फेज विद्युत पंपाद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. खरवड गावातील जवळपास ४५० घरांपैकी ३६० घरांना नळ कनेक्शन देत त्यातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तसेच गावाच्या चारही बाजूला चार ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले.

दरम्यान काही वर्षांनंतर पुन्हा खरवड ग्रामस्थांना पाणी टंचाई भेडसावू लागली. यासाठी आमदार यांनी देखील कूपनलिका केली, मात्र पाणी न लागल्याने ती देखील वाया गेली. गावकऱ्यांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गावातील रहिवासी प्रकाश शिरसाट पुढे आले. प्रकाश शिरसाट स्वतः शेतकरी असून ते ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. गावातील पाण्याची समस्या त्यांना अवगत होती. त्यांनी स्वतःहून आपल्या शेतातील कूपनलिकेच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे निश्‍चित करीत पाण्याची समस्या निकाली काढली.

गावातील लोकसंख्येच्या विचार करता कूपनलिकेद्वारे किती दिवस गावाची तहान भागली जाणार असा या प्रश्नाने ग्रामस्थ चिंतेत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

खरवड ग्रामस्थांना काही वर्षांपूर्वी कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागल होते. त्यामुळे ग्रामस्थांचे खूप हाल झालेत. ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी माझ्या शेतातील कूपनलिका समर्पित केली असून गेल्या सात वर्षांपासून ती कूपनलिका ग्रामस्थांची तहान भागवत आहे.
प्रकाश शिरसाट, शेतकरी, खरवड, (ता. तळोदा, जि. नंदुरबार)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com