सोलापूरच्या शेतकऱ्यांचा उडीद, मका उत्पादनांत डंका

काटमोरे, हलकुडे यांना उडदाचे पहिले दोन्ही पुरस्कार
Urad, Maka
Urad, MakaAgrowon

उडदासाठी बोळकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील राजकुमार हलकुडे यांनी द्वितीय आणि राजेवाडी (ता. जामखेड, जि.नगर) येथील सुजाता कमटकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर मका उत्पादनात द्वितीय पुरस्कार महुद ब्रु (ता. सांगोला) येथील ईश्‍वर कोळेकर यांनी, तर तृतीय पुरस्कार घेरडी (ता. सांगोला) येथील गिरजप्पा यमगर यांनी पटकाविला.

कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखालील सात अधिकाऱ्यांच्या समितीने हे पुरस्कार निवडले आहेत. अनुक्रमे पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी ५० हजार रुपये, द्वितीय पुरस्कारासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शेतकऱ्यांचा सन्मान होईल. राज्य शासन दरवर्षी तृणधान्य, कडधान्य व गळितधान्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करते. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार देऊन हा सन्मान केला जातो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्यस्तरावरील पुरस्कार पटकाविल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

Urad, Maka
Crop Management : कापूस, तूर, मका पिकाची काय काळजी घ्याल?

उडदाचे ४४ क्विंटल, मक्याचे १७७ क्विंटल उत्पादन
संतोष काटमोरे यांनी उडदाचे हेक्टरी सर्वाधिक ४४ क्विंटल, राजकुमार हलकुडे यांनी ३१ क्विंटल आणि सुजाता कमटकर यांनी ३० क्विंटल इतके उत्पादन घेतले. तर मका उत्पादनात सिद्धेश्वर जरे यांनी सर्वाधिक हेक्टरी १७७ क्विंटल, ईश्‍वर कोळेकर यांनी १५७ क्विंटल आणि गिरजप्पा यमगर यांनी १५६ क्विंटल इतके उत्पादन घेतले.

मक्यातील तीनही शेतकरी सांगोल्याचे
मका उत्पादनात राज्यस्तरावरील तीनही पुरस्कार पटकावलेले शेतकरी सांगोला तालुक्यातील आहेत. राज्यस्तरावर एका पिकात, एकाच तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी सर्वाधिक उत्पादनाचे पुरस्कार मिळवणे, हेही या पुरस्काराचे वैशिष्ट्य राहिले आहे.

Urad, Maka
Mung, Urid : खरीप हंगामातील उडीद, मूग धोक्यात

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com