Pauas : अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले

गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरूवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती.
Crop damage
Crop damage Agrowon

Pune Rain News : गेल्या आठवड्यात हवामान विभागाने (Weather Department) पावसाचा अंदाज दिला. त्यानंतर मागील दोन दिवसापासून पुणे जिल्हयात काही प्रमाणात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

त्यातच सोमवारी (ता.६) पुणे जिल्हयातील अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जिल्हयात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.

गेल्या महिन्यापासून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासण्यास सुरूवात झाल्याने धरणातील पाण्याची मागणी वाढू लागली होती. त्यातच अनेक ठिकाणी पीके काढणीच्या अवस्थेत आली होती.

Crop damage
Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

काही ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या काढणीस सुरूवात झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसापासून वातावरणात अचानक बदल होण्यास सुरूवात झाली. पुणे जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

सोमवारी सायंकाळपासून दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली तालुक्यांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मंगळवारीही सकाळपासून

ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असल्याने काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. यामुळे गहू, मका, हरभरा, द्राक्षे, डाळीब पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच मागील दोन वर्षे कोरोनामुळे अडचणीत आलेला शेतकरी अवकाळी पावसामुळे चांगलाच संकटात सापडत आहे.

सध्या पुणे जिल्हयातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, कांदा पिकांला फटका बसत आहे. त्यामुळे वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकरी वर्गामध्ये काहीकाळ चांगलीच धांदल उडाली.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले. काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. तसेच मका द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली.

Crop damage
Crop Damage : कडधान्यासह आंबा पिकाला अवकाळी पावसामुळे धोका

खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे पीके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे. त्यानंतर रब्बी हंगामात ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध अळ्यांनी आक्रमण केले आहे.

सततचे बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यातच दोन दिवसापासून ढगाळ हवामानाचा परिणाम पिकांवर होत आहे.

या प्रादुर्भावामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. याबरोबरच भाजीपाला यासारख्या पिकांना देखील फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

या पिकांचे झाले नुकसान

- काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, हरभरा, ज्वारी,

- भाजीपाला पिकांचेही काही प्रमाणात नुकसान

- द्राक्षे, डाळीब पिकांचेही नुकसान

- पिके कढणीची लगबग वाढली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com