Onion Farmer Protest : महामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांचा रास्तारोको

महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकास अत्यंत तुटपुंजा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

Nashik Onion Farmer Protest : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांद्याच्या भावात सतत (Onion Rate) घसरण होत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शनिवार (ता. ११) संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढत मनमाड-चांदवड राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chandwad APMC) मुख्य प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Protest) केले.

यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शनिवारी (ता. ११) बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर संतप्त झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चांदवड- मनमाड महामार्गाकडे जाऊन रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

Farmer Protest
Milk Rate : दूध उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन करू; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा इशारा 

महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या कांदा पिकास अत्यंत तुटपुंजा भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा निघत नाही. अशी परिस्थिती असतानाही राज्य व केंद्र सरकार मात्र याकडे दुलर्क्ष करत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क भरमसाट वाढले आहे.

याचाही परिणाम कांदा दरावर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकास तीन हजार रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

यावेळी विजय दराडे, त्र्यंबक ठाकरे, शांताराम दळवी, नवनाथ दळवी, सोमनाथ पवार, शिवाजी गोसावी, गोरख फोडसे, संतोष बेदाडे, तुकाराम पिंपळे, तात्यासाहेब पानसरे, विष्णू गायकवाड, शांताराम लोखंडे, पंढरीनाथ पवार, रामभाऊ पिंपळे, कमळाबाई ठाकरे, शालिनी ठाकरे, द्वारकाबाई तांबे, भिकूबाई मोरे आदींनी आंदोलन केले.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

१) कांदा पिकास तीन हजार रुपये हमीभाव मिळावा.

२) नारपारच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करावा.

३) वन व गायरान जमीन करणाऱ्याच्या नावे करावी.

४)ओला दुष्काळाने नुकसानग्रस्तांना शंभर टक्के पीक विमा रक्कम त्वरित द्यावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com