Cotton Rate : अमरापूर येथे विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून पन्नास लाख कापसाच्या गाठी आयात करून त्यावरील आयात शुल्क अकरा टक्के माफ करून व्यापाऱ्यांचा फायदा केला आहे.
Rasta Roka Andolan
Rasta Roka AndolanAgrowon

Nagar News : कापसाला दर (Cotton rate) नाही, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. बँकेचे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होत असून, शासनाने या मागण्यांची दखल घेऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी करत अमरापूर (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी (ता. २४) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roka Andolan) केले.

कापसाला बाजारात (Cotton Market) सध्या प्रति क्विंटल साडेसात हजार रुपयांचा दर मिळत आहे. हा दर म्हणजे उत्पादन खर्च निघत नसल्याने कापूस उत्पादक संकटात आहे.

केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून पन्नास लाख कापसाच्या गाठी आयात करून त्यावरील आयात शुल्क अकरा टक्के माफ करून व्यापाऱ्यांचा फायदा केला आहे.

Rasta Roka Andolan
Cotton Rate : कापूस बाजारात आज काय घडलं? सर्वाधिक दर किती मिळाला?

या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढावेत. कांद्याला आठ ते दहा रुपयांपेक्षा अधिक दर नाही.

यंदा खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन देखील अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत. बँकेचे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाची घोषणा केली.

मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाहीत. पीकविम्याचे पैसेही अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

त्यामुळे शासनाने या मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करत अमरापूर (ता. शेवगाव) येथे शेतकरी विकास मंडळाचे शिवराज कापरे, बाळासाहेब पोटफोडे, बाळासाहेब मरकड, दिलीप पोटफोडे, गणेश बोरुडे आदींसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com