
Solapur News : नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी संबंधित खातेदारांनी बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे व आधार लिंक असल्यास पन्नास ते शंभर रुपयांचे ट्रान्झॅक्शन करण्यात यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शमा पवार यांनी सांगितले.
श्रीमती पवार म्हणाल्या, की उत्तर सोलापूर, मंद्रूप, अक्कलकोट, बार्शी, माढा, करमाळा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व सांगोला तालुक्यांतील पात्र बाधित शेतकऱ्यांची यादी संबंधित तहसीलदार यांनी पोर्टलवर अपलोड केली आहे.
या यादीमधील पेमेंट स्टेटस रिमार्कमध्ये ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस सक्सेस दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस फेल्ड दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
सदर पोर्टलवर शासनाने पेमेंट हिस्टरी नावाचे नवीन टॅब उपलब्ध करून दिले आहे. त्यामधून तालुकानिहाय यादी डाउनलोड करून संबंधित तहसीलदार यांना उपलब्ध करून दिली आहे.
सदरची यादी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी / ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. या यादीमधील शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची पडताळणी करून आधार लिंक करून घ्यावे, असेही पवार यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.