Solar Agriculture Pump Scheme : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

Solar Agriculture Scheme : ‘राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
Solar Pump Set
Solar Pump SetAgrowon

Solar Agriculture Scheme Pandharpur News : ‘‘राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे यांनी केले.

महावितरण विभागीय कार्यालय पंढरपूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत ग्राहक तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.

या वेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. भुतडा, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, जिल्हा सचिव सुहास निकते, तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, संघटक महेश भोसले, सचिव प्रा. धनंजय पंधे आदी उपस्थित होते.

Solar Pump Set
Chief Minister Eknath Shinde : वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याचे धोरण

भोळे म्हणाले, ‘‘शेतीसाठी पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि ते मिळविण्यासाठी विजेची गरज असते. ही वीज जर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून म्हणजे सौरऊर्जेतून मिळविण्यात आली, तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे होणार आहे.

शेतकरी वापरत असलेल्या पारंपरिक विजेवर चालणाऱ्या कृषिपंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या समस्यांमुळे अखंडित व शाश्‍वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात."

"तसेच जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालवितात आणि ते अत्यंत महागात पडते. पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्याला सौर कृषिपंप हा उत्तम पर्याय आहे.’’

या वेळी शेतकरी ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच वीजजोडणी, जादा वीजबिल आकारणी आदी बाबत शंकांचे निराकरण करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com