Nashik District Bank : नाशिक जिल्हा बॅंकेच्या कारवाईविरुद्ध शेतकऱ्यांची वज्रमूठ

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी एकवटत आहेत.
District Bank
District BankAgrowon

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Central Cooperative Bank) थकबाकीदारांवर केल्या जात असलेल्या जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी एकवटत आहेत.

तालुक्यातील नांदुर्डी, दावचवाडी, रानवड, पालखेड व लोणवाडी येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत बुधवारी (ता. ५) निफाड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमीन जप्तीच्या कारवाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

District Bank
Nashik Crop Damage : शासकीय यंत्रणा बांधावर न पोहोचल्याने पंचनामे नाहीच

केंद्र व राज्य सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. नांदुर्डी, दावचवाडी, रानवड, पालखेड व लोणवाडी येथे शेतकऱ्यांनी ‘आम्ही नादार झालो’ अशी शपथ घेत घरी मरण्यापेक्षा सरकार दरबारी उपोषण करून मरू असा निर्धार केला.

या वेळी शेतकरी संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान (भाऊ) बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, निफाड उपतालुकाध्यक्ष संजय पाटोळे, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य तुषार गांगुर्डे, गंगाधर शिंदे, उमाकांत शिंदे, कृष्णा जाधव, दौलत कुयटे, दीपक शिंदे, रमेश आहेर, दिनकर मोरे, पुंजा हांडगे, अशोक आहेर, नंदू खैरे, मधुकर कुभांर्डे, नारायण आहेर, बापू जाधव, सर्जेराव पोटे, प्रभाकर शिंदे, रावसाहेब जगदाळे, अमृत निकम, रमेश देवकर, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब वाघ, भरत कुशारे, प्रकाश वाढवणे, रामदास जाधव, रामदास शिरसाठ, रमाकांत जाधव, ज्ञानेश्वर थेटे, गणपत चौधरी, सुभाष चोपडे, सुनील वाघ, गोकुळ दौंड, दिलीप मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com