Farmers Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी साडेतीन हजार कोटींची मदत

नागपूर, अमरावती, औरंगाबाद विभागात सर्वाधिक नुकसान
Crop Damage
Crop DamageAgrowon

मुंबई ः जून महिन्यापासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Excess Rain) शेती आणि शेतमालाच्या झालेल्या नुकसानीसाठी (Crop Compensation) राज्य सरकारने ३ हजार ५०० कोटी ७१ लाख रुपये मदतीच्या वितरणास (Farmers Assistance) मान्यता दिली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांत सर्वाधिक नुकसानीची नोंद झाली आहे. तर कोकण विभागात सर्वात कमी नुकसानीची नोंद झाली आहे.

राज्यात अतिवृष्टी (Excess Rain), पुरामुळे (Flood) झालेल्या नुकसानीसाठी जिरायती पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत तर बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत ३६ हजार रुपये करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. राज्यात अंदाजे १८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यात वाढ झाली असून २३ लाख, ८१ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यापोटी तीन हजार ४४५ कोटी २५ लाख, ५५ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

Crop Damage
Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?

राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे १३ हजार ३४५. ६१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. यात काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे. तर अनेक ठिकाणी तीन इंचापेक्षा जास्त जाडीचा गाळ साचल्याने क्षेत्र बाधित झाले आहे. यापोटी ५६ कोटी, ४५ लाख ६६ हजार रुपयांची मदत देण्यात येईल.

सततच्या पावसाच्या नुकसानीची भरपाई नाही

अतिवृष्टीग्रस्तांमुळे पिकांच्या नुकसानभरपाईसाठी २४ तासांत ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली असल्यास तेथे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा निकष लावला जातो. मात्र, पावसाळ्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे पंचनाम्यानुसार मदत मिळावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी केली होती. मात्र, जुन्याच निकषांनुसार मदत करण्यात येणार आहे. शेतजमिनीतील गाळ, डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा काढणे, मत्सशेतीची दुरुस्ती, मातीचा थर काढणे, दरड कोसळणे, जमीन खरडून जाणे किंवा खचणे, नदीपात्र बदलल्याने जमीन वाहून जाणे यासाठी दिली जाणारी मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत असेल. या शेतकऱ्यांनी अन्य कुठलीही मदत घेतलेली नसावे.

भरपाईची रक्कम थेट खात्यावर

पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी गरजेनुसार कोशागारातून रक्कम काढून ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करण्यास मान्यता देणार आहेत. लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

२३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर

एकूण बाधित क्षेत्र

३ हजार ४५२ कोटी २५ लाख ५५ हजार रुपये

मदतीची रक्कम

Crop Damage
Rice Export Ban: तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी

विभागनिहाय मदत (लाखांत)
३. ४४

औरंगाबाद


२१५१.९५

अमरावती


३४८४.२७

नागपूर

५६ कोटी ४५ लाख ६६ हजार रुपये

मदतीची रक्कम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com