Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाढवून मिळणार

राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून वाढीव पीककर्ज (Crop Loan) मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने हा निर्णय घेतला असून, बुधवारी (ता. १२) समितीचे सचिव विलास देसाई यांनी त्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

ऊस, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसह सर्वच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तयार केलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडे गेला होता.

त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या सचिवांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून या वर्षांत शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज मिळणार आहे.

त्यात हापूस व केशर आंबा, मिरची, टरबूज, कलिंगड, फुलशेती, शेवगा, वांगी, ड्रॅगनफ्रूट, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, कापूस, मका, गहु, हरभरा, ऊस, द्राक्ष, डाळिंब, चिकू, पपई, पडवळ, कारले, भाजीपाला, हळद व कांदा अशा पिकांचा समावेश आहे.

Crop Loan
Crop Loan : परभणीत वर्षभरात १ हजार ४५३ कोटींवर पीककर्जाचे वितरण

विशेष बाब म्हणजे बाजरी (हेक्टरी २३ हजार १०० रुपये), भुईमूग (३४ हजार रुपये), तूर (३६ हजार ८०० रुपये), कापूस (४९ हजार रुपये) व मका (२९ हजार ७०० रुपये) या जिरायतील पिकांनाही बॅंकांकडून पीककर्ज मिळणार आहे.

तसेच एक गाय असलेल्यांना ३५ हजार रुपये तर म्हैस असल्यास ३७ हजार आणि शेळीमेंढी (दहा शेळ्या, एक बोकड असावे) पालन व्यवस्थापनासाठी एक लाख १० हजार रुपये, कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी (किमान १०० कोंबड्यांची मर्यादा) २७ ते ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय बॅंका करतील, असेही आदेशात नमूद आहे.

शेतकऱ्यांनो, माहिती करून घ्या

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. बॅंकेत गेल्यावर काहीवेळा शेतकऱ्यांना कोणत्या पिकांसाठी हेक्टरी किती पीककर्ज मिळते, हे माहिती नसते.

पण, नवीन निर्णयाप्रमाणे कोणत्या पिकाला आणि किती कर्ज द्यायचे हे ठरलेले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी त्याची माहिती करून घ्यावी आणि आपल्याला हव्या त्या पिकासाठी कर्जाची मागणी बँकेकडे करावी, असेही समितीने म्हटले आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज व्याजाच्या रकमेचा परतावा मिळावा

पीकनिहाय हेक्टरी कर्ज मर्यादा

ऊस - १,२६,००० रुपये

द्राक्ष - ३,०५,८०० रुपये

डाळिंब - १,५८,४०० रुपये

ड्रॅगनफ्रूट - २,२०,००० रुपये

आंबा - १,५०,००० रुपये

हळद - १,१५,५०० रुपये

मिरची - ८८००० रुपये

पपई - ८४,७०० रुपये

कांदा - ७१,५०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com