Soil Testing : माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रा महत्त्वाच्या

Turmeric Production : हळद पिकांची उत्पादकता वाढीसाठी जमिनीची निवड, करपा प्रतिकारक वाण, बेणे प्रक्रिया करून गादी वाफा पद्धतीने लागवड, काटेकोर पाणी व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार शिफारशीत खतांच्या मात्रा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
Parbhani News
Parbhani NewsAgrowon

Turmeric Production Parbhani News : हळद पिकांची उत्पादकता वाढीसाठी जमिनीची निवड, करपा प्रतिकारक वाण, बेणे प्रक्रिया करून गादी वाफा पद्धतीने लागवड, काटेकोर पाणी व्यवस्थापन, माती परीक्षणानुसार शिफारशीत खतांच्या मात्रा या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अमित तुपे यांनी केले.

भोगाव देवी (ता. जिंतूर) येथे बुधवारी (ता. १७) ‘अॅग्रोवन’तर्फे आयोजित व रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. तर्फे प्रायोजित हळद लागवड व्यवस्थापन या विषयावर ‘अॅग्रोवन संवाद’ चर्चासत्रात ते बोलत होते.

भोगाव देवी शेतकरी उत्पादक कंपनीचे शेषराव देवकर अध्यक्षस्थानी होते. रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, कृषिविद्या विभाग प्रमुख राजपाल सिंग, उत्तर मध्य महाराष्ट्र व्यवस्थापक विकास कुलकर्णी, विजय घुगे, तालुका कृषी अधिकारी शंकर काळे, प्रगतिशील शेतकरी लक्ष्मीकांत देशमुख, ‘सकाळ’चे सहाय्ययक व्यवस्थापक (वितरण) अनंता रेनगडे, कृषी सहायक सुनील भाले, पुरुषोत्तम कदम, ‘अॅग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर आदी उपस्थित होते.

Parbhani News
Turmeric Cultivation Discussion : आरडव येथे हळद, सोयाबीन, तूर, संत्रा लागवडीबाबत चर्चासत्र

तुपे म्हणाले, की शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करावी. माती परीक्षण करून घ्यावे. करपा प्रतिकारक वाणांची निवड करावी. घरचे दर्जेदार बेणे वापरावे. करपा रोगास प्रतिबंधासाठी बुरशीनाशकांची प्रक्रिया करून गादी वाफा पद्धतीने लागवड करावी. जमीन वाफसा स्थितीत राहील त्यादृष्टीने पाणी व्यवस्थापन करावे.

कंद माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरमशागत करताना हळद कंद मातीने झाकलेले राहतील याची काळजी घ्यावी.

लोणाळे व राजपाल सिंग म्हणाले, की हळदीच्या उत्पादनात ५० टक्के वाटा पाणी व्यवस्थापनाचा आहे.काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी पाट पाणी पद्धतीऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा अंगीकार करावा. दर्जेदार ठिबक संचाचा वापर करावा.

काळे म्हणाले, की उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांना शिफारशीनुसार खतांच्या मात्रा द्याव्या. चांगल्या आरोग्यासाठी ज्वारी, बाजरी आदी भरडधान्याचा आहारात समावेश करावा. अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी सूत्रसंचालन केले, तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com