Millet Production : महोत्सवातून तृणधान्याच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन मिळेल

मिलेट्‍स व प्राकृतिक अन्नधान्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देतानाच, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.
MP Dr. Anil Bonde
MP Dr. Anil BondeAgrowon

Amravati News : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांची भरीव अंमलबजावणी होत आहे.

मिलेट्‍स व प्राकृतिक अन्नधान्याच्या उत्पादनाला (Food Grain Production) प्रोत्साहन देतानाच, अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

त्यादृष्टीने जिल्हा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी बुधवारी (ता. १) येथे केले.

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा (Agricultural Festival) शुभारंभ करताना ते बोलत होते.

MP Dr. Anil Bonde
Millet Year : पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजून घ्या

खासदार नवनीत राणा अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोल्हे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे, जयंत डेहणकर, संगीता शिंदे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, कृषी सहसंचालक किसनराव मुळे, कारितास इंडियाचे साजू एम. के., डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, ‘रामेती’चे प्राचार्य विजय चवाळे, ‘माविम’चे सुनील सोसे आदी उपस्थित होते.

मेळघाटातील आदिवासी महिला कार्यकर्ता जिजीबाई मावसकर यांनी मनोगतातून भरडधान्यांचे महत्व व्यक्त केले. श्रीमती निस्ताने यांनी प्रास्तविक केले. क्षीप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. खर्चान यांनी आभार मानले.

MP Dr. Anil Bonde
Millets : अमरावतीला कृषी महोत्सवात भरडधान्यासाठी स्वतंत्र विभाग

कृषी महोत्सवात भरडधान्यांसाठी स्वतंत्र विभाग आहे. त्याचप्रमाणे, कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय उत्पादने, माविम महिला बचत गट, कृषी निविष्ठा आदींच्या एकूण २०० कक्षाचा समावेश असून महोत्सव ५ मार्चपर्यंत चालणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com