Exam Center : संवेदनशील परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये होणार आहे.
 Exam
ExamAgrowon

Nagar News : दहावी आणि बारावी परीक्षेची (Exam) प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. या परीक्षांतील गैरप्रकार टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत उपाययोजना करण्यात आली आहे.

परीक्षा कालावधीत महसूल, तसेच पोलिस अधिकारी (police Officer), तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रांना भेटी देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

नगर येथे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosle) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये होणार आहे. त्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी आदेश दिले असून, संवेदनशील केंद्रावर दहावी बारावीच्या परीक्षेत चित्रीकरण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

 Exam
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा, कॉलेज बंद; परिक्षा नियमित

प्रश्‍नपत्रिकेबाबत निर्णय

परीक्षा केंद्र परीसरातील सर्व झेरॉक्स सेंटर पेपरच्या कालावधीत बंद ठेवावेत, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकाच्या भेटी वाढवाव्यात, परीक्षार्थ्यांना परीक्षा वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका वाचनासाठी दिला जाणारा वेळ रद्द केला आहे.

वेळापत्रकात दिलेल्या वेळेनंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. केंद्रांवर पोलिस बंदोबस्त मागवा. या बाबतच्या सूचना परीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना...

१) परीक्षा कालावधीत जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी द्या.

२) उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेषकरून भेटी देऊन गैरप्रकारास आळा घालावा.

३) प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्या भेटी संबंधी नियोजन करा.

४) तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्याचे प्रयत्न करा.

५) विद्यार्थिनींची झडती केंद्रावर उपस्थित असणाऱ्या महिला पर्यवेक्षामार्फत घ्यावी.

६) परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रानिक्स साधनांच्या (मोबाईल) वापरावर प्रतिबंध करावा.

७) परीक्षा केंद्रावर एकाचवेळी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com