Water Supply Department : अखेर मोखाड्यात पाणीपुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

दोन ते तीन वर्षांपासून रखडलेली कामे, दोनच दिवसांत करण्यात आली आहेत.
Water Supply
Water SupplyAgrowon

Mokhada News : मोखाड्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

दोन ते तीन वर्षांपासून रखडलेली कामे, दोनच दिवसांत करण्यात आली आहेत. त्यामुळे पाणीटंचाई, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांची समस्या सुटली आहे. तसेच इतर मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने प्रदीप वाघ यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

Water Supply
Water Supply : घोसरवाड प्रकल्पामधून इचलकरंजीला पाणी

या वेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवडुंगे, उपअभियंता राजेश पाध्ये, जलसंधारण विभागाचे उपअभियंता वारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तहसीलदार मयूर खेंगले, गटविकास अधिकारी कुलदीप जाधव आणि पोलिस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे उपस्थित होते. मोखाड्यातील गोमघर, चास आणि कारेगाव नळपाणीपुरवठा योजना गेली दोन ते तीन वर्षांपासून रखडली होती. आता ही सर्व कामे सुरळीत होणार आहेत.

अनेक कामे मार्गी

वाघ यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यात रखडलेले सायदे धरणाचे काम सुरू झाले, गोमघर व चास येथील पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.

कारेगाव येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सूर्यमाळ आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com