Gangamai Sugar Factory : तज्ज्ञ पथकाकडून गंगामाई साखर कारखान्याची पाहणी

पथकाच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा समजणार आहे. या आगीच्या घटनेमुळे कारखाना बंद असल्याने परिसरात उसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Nagar News : शेवगाव तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्यातील (Gangamai Sugar Factory) इथेनॉल प्रकल्पाला (Fire In Ethanol Project) शनिवारी (ता. १५) भीषण आग लागली होती. या आगीत कारखान्याचे ६० ते ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली. रविवारी (ता.२६)) घटनास्थळी तज्ज्ञांच्या एक पथकाने दाखल झाले होते. पथकाच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा समजणार आहे. या आगीच्या घटनेमुळे कारखाना बंद असल्याने परिसरात उसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Sugar Factory
Sharad Pawar Sugar: साखर कारखाना नीट चालवण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष भलतीकडेच... शरद पवारांचा टोला

गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पास शॉर्टसर्किटमुळे शनिवार (ता. २५) सायंकाळी सहा वाजता आग लागली होती. या आगीत इथेनॉल प्रकल्पासह एका बारा चाकी टँकर (एमएच- १७ बीएक्स- ८०१२) आग लागून जळून खाक झाला.

यावेळी टँकरचालक माणिक अप्पासाहेब गोरे, डिस्टिलरी ऑपरेटर अशोक अण्णासाहेब गायकवाड, कामगार पंडित नागनाथ काकडे हे तीन जण किरकोळ जखमी झाले.

१५ अग्निशामक बंबांनी रविवारी (ता. २६) पहाटे तीन वाजता आग आटोक्यात आणली. रविवारी घटनास्थळाला तज्ज्ञांच्या एका पथकाने भेट दिली. पथकाच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा समजणार आहे.

Sugar Factory
Sugar Production : देशात २२८ लाख टन साखर उत्पादन; १७ कारखान्यांचा हंगाम संपला

मात्र इथेनॉल प्रकल्पाचे सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान कारखाना कर्मचारी वसाहतीमध्ये १० ते १२ ठिकाणी रोख रक्कम, दागिने व इतर साहित्याची चोरी झाली. ज्यांच्या घरी चोरी झाली, त्या कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com