
kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर, रेडिओ ॲमॅचुअर क्लब कोल्हापूर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे यांचे कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, आयईईईई संस्था अमेरिका यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेला तंत्रज्ञानावर आधारित भूर्प्रवण भागासाठी गुणकारी संदेश यंत्रणेच्या प्रकल्पाचे जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर प्रवणतेचा विचार करून पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा इतर सर्व संदेश देवाणघेवाण यंत्रणा बंद होतात. अशा वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी बिनतारी संदेश यंत्रणा ही संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते.
या यंत्रणेचा वापर करणाऱ्या या हौशी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील सदस्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीच्या कालावधीमध्ये व्यक्त विरहित संदेश देवाणघेवाण सुरू राहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातील पूरबाधित होणारी गावे आंबेवाडी व चिखली या तिन्ही ना हॅम रेडियो तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचं काम या प्रकल्पाने केलेला आहे.
या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये तसेच दुरुस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पूरबाधित भागाशी व्यत्यविरहित संदेश देवाण-घेवाण सातत्याने करता येणार आहे
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी प्रकल्पाविषयीची माहिती दिली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण तसेच छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.