इंदोरच्या सोया महाकुंभमध्ये राज्याचे दालन प्रथम

केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने भारतीय कृष अनुसंधान परिषद, अखिल भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान इंदोर येथे आयोजित सोया महाकुंभमध्ये राज्याच्या कृषी विभागाने लावलेल्या दालनाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इंदोरच्या सोया महाकुंभमध्ये राज्याचे दालन प्रथम
SoybeanAgrowon

अकोला ः केंद्रीय कृषी व कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने भारतीय कृष अनुसंधान परिषद (ICAR), अखिल भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान इंदोर येथे आयोजित सोया महाकुंभमध्ये (Soya Mahakumbh) राज्याच्या कृषी विभागाने लावलेल्या दालनाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाशीमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व त्यांच्या चमूने या दालनात सोयाबीन उत्पादकता (Soybean Production) वाढीसाठी अष्टसूत्रीचा वापर व इतर माहितीचे प्रदर्शन केले होते.

सोयाबीनची उत्पादकता वाढीसाठी नवनवीन वाण, लागवड तंत्रज्ञान, व्यवस्थापन अशा विविध बाबींच्या माहितीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने २९ ते ३१ मे या कालावधीत सोया महाकुंभ झाला. या मेळाव्याला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र झाले. तसेच माहितीच्या प्रसारासाठी १०० वर दालने ठेवण्यात आली होती. या दालनांमध्ये राज्याच्या कृषी विभागाचेही दालन होते. या दालनातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात आली. सोबत सोयाबीन उत्पादकता वाढीच्या दृष्टिने तयार केलेल्या अष्टसूत्रीची माहिती तोटावार यांनी चर्चासत्रादरम्यान सविस्तरपणे दिली. दालनाच्या गटात राज्याला प्रथम पुरस्कार देण्यात आला. तोटावार व चमूने हा पुरस्कार स्वीकारला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com