Nanded Turmeric Festival : पाच दिवशीय हळद महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केले.
Nanded Turmeric Festival
Nanded Turmeric FestivalAgrowon

Nanded News : महाराष्ट्र शासन कृषी विभाग (Agriculture Department), आत्मा तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २५ ते २८ मार्च दरम्यान हिंगोली येथील रामलिला मैदानावर मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सव (Turmeric Festival) आणि जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन (Agriculture Festival) करण्यात आले आहे.

या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी आवाहन केले.

मा. बाळासाहेब ठाकरे (हरिद्रा) हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सव आणि जिल्हा कृषी महोत्सवाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २१) नांदेड येथील सहकार सुर्य येथे बैठक झाली.

Nanded Turmeric Festival
Jalna Agriculture Festival : जालना येथे उद्यापासून कृषी महोत्सव

यावेळी माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा हळद प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक रविशंकर चलवदे, एम. वाय. राजे, सहायक प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा, निवृत्त तालुका कृषी अधिकारी आर. एम. देशमुख यांची उपस्थिती होती.

या महोत्सवा संदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २५ ते २८ मार्च दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत हिंगोली येथील रामलिला मैदानावर मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सव आणि जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात हळद उत्पादनात माहिती प्रसार तंत्रज्ञानाचा वापर, हळद काढणी पश्चात हाताळणी प्रक्रिया व मूल्य संवर्धन, हळद विपणन, पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, सेंद्रिय हळद लागवड, अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता मार्गदर्शनासह विविध योजना बाबत मार्गदर्शन हळद तसेच इतर प्रक्रियायुक्त शेतमाल पदार्थांचे प्रदर्शन व विक्री खरेदीदार - विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Nanded Turmeric Festival
Turmeric Cultivation : यंदा हळदीखालील क्षेत्र २० टक्‍क्‍यांनी घटणार

यासोबतच महोत्सवात प्रगतशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि परिसंवाद, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांचा सहभाग, पीक संरक्षण उपकरणे तसेच अन्न प्रक्रिया करिता आवश्यक मशिनरीचे प्रदर्शन शेतकऱ्यांचे गट व शेतकरी उत्पादक संस्था, खासगी कंपन्यांचा सहभाग या महोत्सवात केला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com