
Satara News : जिल्ह्यातील ऊस गाळप अंतिम टप्यात आला असून १५ पैकी पाच कारखान्यांच्या हंगाम आटोपला आहे. जिल्ह्यात रविवार (ता. १९) अखेर ९७ लाख ७६ हजार ९६० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे.
साखर उताऱ्यात सह्याद्रीची तर गाळप व साखरनिर्मितीत जरंडेश्वर कारखान्यांची आघाडी कायम आहे.
सातारा जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांची गाळप हंगाम सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात तोडणी यंत्रणा विस्कळीत असल्याने गाळप हंगाम संथगतीने सुरू झाला होता. यामुळे गाळप हंगाम लांबेल असा अंदाज व्यक्त होता.
मात्र तोडणी यंत्रणा सुरळीत झाल्यावर गाळपास वेग आला आहे. त्यातच जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनी ऊस नेण्यास सुरुवात केल्यावर उसाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. यामुळे कारखान्यांनी ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होताना अंतिम टप्प्यात कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी रविवारपर्यंत (ता. १९) ९५ लाख २८ हजार ४१९ टन ऊसाचे गाळप करत त्याद्वारे ९७ लाख ७६ हजार ९६० क्विंटल साखरनिर्मिती केली असून सरासरी १०.२६ टक्के सार उतारा मिळत आहे.
हंगाम अंतिम टप्यात असतानाही साखर उताऱ्यात अपेक्षित सुधारणा होत नाही. साखर उताऱ्यात सह्याद्री कारखान्याची आघाडी कायम असून या कारखान्याचा सरासरी १२.४० टक्के साखर उतारा मिळत आहे.
त्यापाठोपाठ रयत-अथणी कारखान्याचा १२.२८ टत्ते साखर उतारा मिळत आहे. गाळप व साखर निर्मितीत जरंडेश्वर कारखान्याची आघाडी कायम आहे. या कारखान्याने १६ लाख २७ हजार ३० टन उसाचे गाळप करून त्याद्वारे १६ लाख ४१ हजार ८०० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे.
१५ पैकी पाच कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. यामध्ये खंडाळा, किसनवीर, ग्रीन पॅावर, शरयु तसेच माण-खटाव कारखान्यांचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.