Jayant Patil : देश महासत्ता होण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणे आवश्यक

संकुचित विचार भारताच्या विकासात बाधा निर्माण करतो. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्यातच आपले हित आहे.
jayant patil
jayant patilAgrowon

Nashik News : संकुचित विचार भारताच्या विकासात बाधा निर्माण करतो. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्यातच आपले हित आहे. तसेच जागतिक स्तरावर देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रशासनाने पुढाकर घेणे आवश्यक आहे.

समृद्ध भारत घडविण्यासाठी दैनंदिन योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत कशा पोहोचल्या जातील याकडे आज लक्ष देण्याची गरज आहे. धर्माधर्मातील तेढ नष्ट करून एकसंघ भारत निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी (ता. २९) महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे ३९ वे अधिवेशन व भारत आणि जागतिक राजकारण या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

jayant patil
Tomato Market Fraud Nashik : व्यापाऱ्यांनी टोमॅटो उत्पादकांना दीड कोटीला गंडवलं

अध्यक्षस्थानी ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. आमदार दिलीप बनकर, मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संमेलनाध्यक्ष डॉ. लियाकत खान, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, संचालक शिवाजीराव गडाख, विजय पगार, संदीप गुळवे, लक्ष्मण लांडगे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, संयोजक प्रा. ज्ञानोबा ढगे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनील पाटील, सुरेश भटेवरा, राजेंद्र डोखळे, शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज

ठाकरे यांनी, भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान असूनही शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच येत आहे, त्यासाठी वर्तमान राजकीय समीकरणे बदलण्याची गरज आहे, तरच भविष्यात भारताची आर्थिक परिस्थिती समाधानकारक होईल, असा आशावाद व्यक्त केला. आमदार बनकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com