
Solapur News : उजनी धरणातून उन्हाळी हंगामात (Summer Season) यापूर्वी दोन आवर्तने दिली जात होती. पण आता तिसरे आवर्तनही देण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पाणी नियोजनाची बैठक झाली. श्री. विखे पाटील म्हणाले, की उन्हाळी आवर्तनाच्या पहिल्या दहा दिवसांत नदीकाठावरील वीज रोज वीस तास बंद करण्यात येणार आहे.
सोलापूर शहराला पिण्याचे पाणी व शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनात वेळेत पाणी मिळावे, त्यांची तक्रार येणार नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी काम करावे.
उन्हाळी आवर्तनातील अनधिकृत पाणी उपसा नियंत्रित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
उजनीतून हे पाणी सोडल्यानंतर पुढे कर्नाटक परिसरातही पाण्याचा अवैधरीत्या उपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तेथील जिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधून तेथेही वीजपुरवठा बंद ठेवण्याची कार्यवाही करावी.
या पाणी आवर्तनाच्या पाणीपट्टी वसुलीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा, तसेच कारखानदारांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री विखे-पाटील यांनी केले.
धरणात ६४ टक्के पाणी साठा
उजनी धरणात सध्या पाण्याची पातळी ४९५.०९५ मीटर इतकी आहे. तर पाण्याचा एकूण साठा ९८.१३ टीएमसी आहे. त्यापैकी ३४.४७ टीएमसी उपयुक्त साठा आहे. आणि या पाण्याची टक्केवारी ६४.३४ टक्के इतकी आहे.
सध्या सीना-माढा उपसा योजनेला ३३३ क्युसेस, बोगद्याला ९०० क्युसेस, मुख्य कालव्याला १९०० क्युसेस इतके पाणी सोडण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.