Conservation Fort Raigad : किल्ले रायगडचे संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने करणार

अवघ्या जगामध्ये सागरी किल्ले केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. जलदुर्ग आणि गडदुर्गांनी रायगड जिल्हा समृद्ध आहे.
Fort Raigad
Fort RaigadAgrowon

Roha News : अवघ्या जगामध्ये सागरी किल्ले केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. जलदुर्ग आणि गडदुर्गांनी रायगड जिल्हा समृद्ध आहे. त्यामुळे रायगडमध्ये सी-फोर्ट सर्किट टुरिझम करण्यात यावे. किल्ले रायगडाचे संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीनेच केले जाईल, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी रोहा येथे केले. ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

रायगड जिल्ह्यातील ५९ किल्ल्यांची ओळख सांगणाऱ्या ‘इये देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे होते.

आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. त्यांची शिकवण सांगतो. आपले ३००-४०० वर्षांचे इतिहास पाहावे. सध्या जे द्वेषाचे राजकारण सुरू आहे, ते यापूर्वी कधीही नव्हते. जे काही महाराष्ट्रात चालले आहे. ते आपले संस्कार आहेत का? मला राजकारणावर बोलायचे नव्हते;

Fort Raigad
Raigad News : रायगडमध्ये मार्च एडिंगची कामे जोरात

परंतु मी प्रामाणिकपणे हे बोलतोय. कारण आम्ही महाराजांचे संस्कार, त्यांची शिकवण घेऊन पुढे चाललो आहोत, असे संभाजीराजे म्हणाले.

याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, कोमसापचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर, मराठी पत्रकार परिषदेचे मिलिंद अष्टीवकर, आर.आय.ए. अध्यक्ष पी. पी. बारदेशकर, मराठी भाषा समिती सदस्य रायगड मकरंद बारटक्के, उद्योजक विजय मोरे, गिर्यारोहक विवेक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यात गडकोटांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या गडदुर्ग संस्थाचे यथोचित सन्मान यावेळी करण्यात आले.

मकरंद बारटके यांनी पुस्तकाचे परीक्षण जाहीर केले. या वेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गडदुर्ग प्रेमी होते.

वनश्री शेडगेचे कौतुक

रोह्याची मुलगी किती परिवर्तन करू शकते, हे वनश्री शेडगे हिने सातासमुद्रापार लंडनमध्ये दाखवून दिले आहे. छत्रपती शिवरायांचा तेथे केलेले एकेरी उल्लेख हे वनश्रीला पाहावले नाही.

तिने ते बदलायला लावले. यासाठी मी वनश्रीचे मनापासून कौतुक करतो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com