फोर्टिफाइड अन्नपदार्थ : संपूर्ण पोषण, स्वस्थ जीवन

तांदूळ, गहू, तेल, दूध आणि मीठ यांसारख्या मुख्य अन्नपदार्थांमध्ये लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्त्व ‘अ’ आणि जीवनसत्त्व ‘ड’ यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची पौष्टिकता सुधारण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे फूड फोर्टिफिकेशन होय.
Fortified Food
Fortified FoodAgrowon

तांदूळ, गहू, तेल, दूध आणि मीठ यांसारख्या मुख्य अन्नपदार्थांमध्ये लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्त्व ‘अ’ आणि जीवनसत्त्व ‘ड’ यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची पौष्टिकता सुधारण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे फूड फोर्टिफिकेशन होय.अन्नपदार्थांमध्ये लोह, आयोडीन, झिंक, जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व ड यांसारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे ही पोषक तत्त्वे प्रक्रिया करण्यापूर्वी अन्नामध्ये मूळतः असू शकतात किंवा नसू शकतात किंवा प्रक्रिया करताना नष्ट होतात. त्यामुळे ‘फूड फोर्टिफिकेशन' (Fortified Food) गरजेचे आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची (Micro Nutrients) कमतरता किंवा सूक्ष्म पोषक कुपोषणास छुपी भूक म्हणून ओळखले जाते. हा आरोग्यासाठी गंभीर धोका आहे. सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे आवश्यक आहे. काही वेळा संतुलित आहाराचा वापर न केल्यामुळे, आहारात विविधता नसल्यामुळे किंवा अन्नपदार्थांच्या अनुपलब्धतेमुळे पुरेसे सूक्ष्म पोषक घटक मिळत नाहीत.

Fortified Food
दूध, अन्नपदार्थ, औषधांमध्ये भेसळ केल्यास आजन्म कारावास

बऱ्याचदा अन्नावर प्रक्रिया करताना देखील पोषक घटकांचे नुकसान होते. या समस्येचे निराकरण करण्याच्या धोरणांपैकी एक म्हणजे अन्न फोर्टिफिकेशन करणे. ही पद्धत पोषण सुधारण्यासाठी इतर मार्गांनी पूरक आहे, जसे की आहाराचे वैविध्य आणि पूरक आहार.

भारतामध्ये जीवनसत्त्व अ, आयोडीन, लोह आणि फॉलिक ॲसिडमुळे होणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा भार जास्त आहे. यामुळे रातांधळेपणा, गलगंड, अशक्तपणा आणि जन्मजात दोष होतात.

फोर्टिफाइड सॉल्ट

डबल फोर्टिफाइड सॉल्ट (DFS) हे एक नावीन्यपूर्ण उत्पादन आहे. मानवी आहाराद्वारे आयोडीन आणि लोहाची लहान, परंतु महत्त्वपूर्ण मात्रा उपलब्ध करते.

सर्वसाधारणपणे, डबल फोर्टिफाइड सॉल्ट फॉर्म्यूलेशन दैनंदिन आहारातील आयोडीनच्या १०० टक्के गरजेची आणि ३० ते ६० टक्के दैनंदिन आहारातील लोहाची गरज पुरविते.

आयोडीन आणि लोहासह मिठाचे दुहेरी फोर्टिफिकेशन हा आयोडीन आणि लोहाच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी एक शाश्‍वत दृष्टिकोन आहे..

भारताच्या राष्ट्रीय पोषण संस्थेने दुहेरी फोर्टिफाइड सॉल्ट विकसित करण्यात पुढाकार घेतला आहे.

Fortified Food
अन्नपदार्थ निर्यातीसाठी लवकरच नवे धोरण

आयोडीनसह मिठाचे फोर्टिफिकेशन

देशात दर वर्षी नऊ दशलक्ष गरोदर स्त्रिया आणि आठ दशलक्ष नवजात बालकांना आयोडीनच्या कमतरतेच्या विकारांचा धोका असतो.

हिमनदी, पूर, नद्यांचा मार्ग बदलणे आणि जंगलतोड यामुळे वरच्या जमिनीत असलेले आयोडीन सतत बाहेर पडत असते. यामुळे आयोडीनची कमतरता असलेल्या जमिनीतील पिकांमध्ये आयोडीनची कमतरता निर्माण होते. परिणामी, माणसांच्या आहारात आयोडीनचे प्रमाण कमी होते.

आहारातील आयोडीनची कमतरता फोर्टिफिकेशनकरून म्हणजेच मिठात आयोडीन मिसळून भरून काढता येते. आयोडीनसाठी मीठ हे एक प्रभावी वाहक आहे.

आयोडीन कमतरता विकार

गलगंड, हायपोथायरॉईडीझम, क्रेटिनिझम, मेंदूचे नुकसान, बौद्धिक अपंगत्व, सायकोमोटर दोष, श्रवण आणि बोलण्याची कमजोरी, गर्भपात आणि मृत जन्म यासारख्या विकारांचा समावेश होतो.

बुद्ध्यांक ः आयोडीनच्या कमतरतेच्या भागात जन्मलेल्या मुलांचे १३.५ पॉइंट्स कमी असतात. आयोडीन कमतरता विकार हे जगभरात टाळता येण्याजोग्या मेंदूच्या नुकसानीचे एकमेव सर्वांत मोठे कारण आहे.

फोर्टिफाइड खाद्यतेल

भारतातील घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षणाचा अहवाल २०११ नुसार, तेलाचा वापर वाजवी प्रमाणात आहे, सुमारे २०-३० ग्रॅम/व्यक्ती/दिवस आणि सर्व लोकसंख्या गट वापरतात.

जीवनसत्त्व अ आणि ड हे फॅट विरघळणारे जीवनसत्त्वे असल्याने, खाद्यतेल आणि फॅट विद्राव्य जीवनसत्त्व अ आणि ड सह मजबूत करणे ही सूक्ष्म पोषक कुपोषण दूर करण्यासाठी एक चांगली योजना आहे. फोर्टिफाइड तेल २५-३० टक्के जीवनसत्त्व अ आणि ड साठी शिफारस केलेल्या आहारातील गरज प्रदान करण्यासाठी ओळखले जाते.

फोर्टिफाइड अन्नपदार्थाचे नियमन व नियंत्रण

फोर्टिफाइड अन्नपदार्थ जसे की दूध, मीठ, खाद्यतेल, आटा मैदा व तांदूळ या अन्नपदार्थांमध्ये विविध पोषण तत्त्वे मिसळून बाजारात विकले जातात. सदर अन्नपदार्थावर अन्न सुरक्षेच्या अनुषंगाने नियमन व नियंत्रण यांच्या करण्याकरिता अन्नसुरक्षा व मानके (फोर्टिफिकेशन ऑफ फूड), २०१८ ही नियमन बनवण्यात आले आहे.

सदर नियमानाच्या अंतर्गत केलेले फोर्टिफाइड अन्नपदार्थ तसेच सदर अन्नपदार्थांमध्ये मिसळून तयार केले जाणारे सूक्ष्म पोषणतत्त्वे यांचे प्रमाण आणि मर्यादा दिली आहे. प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये किती प्रमाणात सूक्ष्म अन्न पोषण तत्त्वे फोर्टिफाइड करायचे याचे प्रमाण दिलेले आहेत.

पॅकेजिंग आणि लेबलिंग आवश्यकता

सर्व फोर्टिफाइड खाद्यपदार्थ पॅकिंग करताना त्यात जोडलेल्या फोर्टिफिकंटचे स्वरूप आणि त्याचा अशा अन्नाच्या शेल्फ लाइफवर होणारा परिणाम विचारात घेतला जातो.

फोर्टिफाइड फूडच्या प्रत्येक पॅकेजवर त्याच्या लेबलवर "Fortified with............ (Name of fortificant)" आणि या नियमावलीच्या अनुसूची-II मध्ये निर्दिष्ट केलेला लोगो असावा. या लोगोखाली ‘संपूर्ण पोषण स्वास्थ्य जीवन’ ही टॅग लाइनदेखील छापावी.

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियमावली, २०११ च्या तरतुदी फोर्टिफाइड फूड खाद्यपदार्थांना देखील लागू होतील.

लोहाने फोर्टिफाइड केलेल्या खाद्यपदार्थांच्या प्रत्येक पॅकेजमध्ये ."People with Thalassemia may take under medical supervision” हे वाक्य असावे लागते.

फोर्टिफाइड फूडचा प्रचार

अन्न सुरक्षा प्राधिकरण, भारत सरकार/राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश सरकारच्या संबंधित विभागांच्या सहकार्याने पारंपरिक पद्धतीने फोर्टिफाइड अन्नाचे उत्पादन, वितरण, विक्री आणि वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत आहे.

वितरणाबाबत सरकार-अनुदानित कार्यक्रमांमध्ये फोर्टिफाइड फूडच्या वापराचा सल्ला देणे आणि प्रोत्साहन देणे, पोषण आणि फोर्टिफाइड फूडवर जनजागृती, शिक्षण आणि जनजागृती मोहीम आयोजित करणे, तांत्रिक साह्य कार्यक्रम आयोजित करणे आणि छोट्या उत्पादकांना फोर्टिफिकेशन काम करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांना तांत्रिक कौशल्य प्रदान करणे.

कायद्यांतर्गत अधिसूचित केलेल्या प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांना फोर्टिफाइड अन्नाचे पोषक विश्‍लेषण करण्यासाठी सुसज्ज करणे.

‘फूड फोर्टिफिकेशन’चे फायदे

मुख्य अन्नपदार्थांमध्ये पोषक तत्त्वांचा समावेश केला जातो. कारण ते मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आरोग्य सुधारण्यासाठी ही एक उत्कृष्ट पद्धत आहे.

लोकांमध्ये पोषण सुधारण्याची ही एक सुरक्षित पद्धत आहे. अन्नामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश केल्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत नाही. सुरक्षित वापरासाठी विहित मानकांनुसार नियमन केले जाते.

हा एक किफायतशीर मार्ग आहे. त्याचा खाण्याच्या पद्धती किंवा लोकांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही.

चव, सुगंध किंवा पोत यांसारख्या अन्नाची वैशिष्ट्ये बदलत नाही.

अन्नपदार्थांतील फोर्टिफाइड पोषणतत्त्वे

अन्नपदार्थ फोर्टिफाइड पोषणतत्त्वे

मीठ आयोडीन, आयर्न

दूध जीवनसत्त्व अ, ड

खाद्यतेल जीवनसत्त्व अ, ड

पीठ , मैदा लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व-बी -१२, झिंक, जीवनसत्त्व- अ आणि थायमीन, रायबोफ्लेविन, नियासीन

तांदूळ लोह, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व-बी -१२, झिंक, जीवनसत्त्व- अ आणि थायमीन, रायबोफ्लेवीन, नियासीन.

फोर्टिफाइड तांदूळ

दरडोई तांदळाचा वापर जास्त असलेल्या देशांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी तांदूळ फोर्टिफिकेशन ही किफायतशीर योग्य धोरण आहे.

तांदळाचे फोर्टिफिकेशन जीवनसत्त्व आणि खनिजे जोडून ते अधिक पौष्टिक बनवते. डस्टिंग, कोटिंग एक्सट्रुजन तंत्रज्ञानाचा वापर करून तांदूळ फोर्टिफाइड करता येतो.

एक्स्ट्रुजन हे तांदळाच्या फोर्टिफिकेशन प्राधान्य दिलेले तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये तांदळाच्या दाण्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रक्रिया, साठवण, धुणे आणि स्वयंपाक या सर्व बाबींचा विचार करता खर्चाचा विचार केला जातो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com