मैत्रीतून उत्कर्षाकडे

काही जण एकमेकांचे मित्र असतात म्हणजे अगदी वेळ घालवायला सोबत कुणीतरी हवे म्हणून अशी अनेकांची टाइमपास मैत्री असते. गावात असे काही मित्र असतात जे भेटल्यावर गप्पा मारत बसतात.
Friendship
FriendshipAgrowon

काही जण एकमेकांचे मित्र असतात म्हणजे अगदी वेळ घालवायला सोबत कुणीतरी हवे म्हणून अशी अनेकांची टाइमपास मैत्री असते. गावात असे काही मित्र असतात जे भेटल्यावर गप्पा मारत बसतात. त्या गप्पांना शेंडा बुडूख काही नसते. जिवाला जीव देणारे एकमेकांच्या सुख दुःखात साथ देणारे एकमेकांना मदत करणारे जिवलग मित्रसुद्धा असतात. मात्र आपल्या मैत्रीचा सकारात्मक वापर करून समाजासाठी भरीव कामगिरी करणारे, नवीन संकल्पना राबवणारे, एकमेकांच्या साथीने नवीन व्यवसायात यशस्वी होणारे हेच खरे मित्र असतात. ध्येयाने प्रेरित होऊन सोबतीने आपले साध्य मिळवण्यासाठी झटत असताना आपोआपच दोघांचाही उत्कर्ष होत असतो.

Friendship
Fertilizer : ‘एमओपी, ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको

आम्ही एकमेकांचे मित्र आहोत असे सांगणारे, कायम सोबत फिरणारे दोघे जण बेरोजगार आहेत. त्यांना एकदा म्हणालो, की आजकाल नोकऱ्या मिळणे मुश्कील आहे. तुम्ही चांगले मित्र आहात. दोघेही हुशार आहात तर तुम्ही दोघे मिळून एखादा व्यवसाय का करत नाहीत? त्या दोघांचेही म्हणणे असे होते, की असा विचार आम्ही भरपूर वेळा केला. कित्येकदा आम्ही व्यवसायाचे नियोजन सुद्धा केले, परंतु दोघांनी मिळून केलेल्या व्यवसायात नंतर वाद निर्माण होऊ शकतात. असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे.

Friendship
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र आहोत. उगीच आमच्यात वाईटपणा नको. आमची मैत्री आम्हाला तोडायची नाही. मी त्यांना म्हणालो की तुम्ही एकमेकांना जिवलग मित्र समजता, मग काहीही झाले तरी आपली मैत्री तुटणार नाही असा तुमच्या मैत्रीवर तुमचा विश्‍वास असायला हवा. मित्राकडून काही चूक झाली तर चांगला मित्रच त्याची चूक सांभाळून घेऊन त्याला सुधारण्याची संधी देऊ शकतो. व्यवसायात काही नुकसान झाले तर मैत्रीच्या नात्याने त्यागाची भावना हवी.

व्हॉट्सॲपवर ‘दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस' अशी मित्राची ओळख करून देता. ‘दोस्तासाठी काही पण’ असे व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवता मग ते तुम्ही प्रत्यक्षात का आणत नाहीत? एकमेकांच्या प्रगतीत जर तुमची मैत्री आड येत असेल तर तुमच्या मैत्रीचा फायदा काय? तुम्ही बेरोजगार आहात, तुम्हाला वेळ जात नाही म्हणून तुम्ही एकमेकांचे मित्र असाल तर अशी मैत्री जपून तुम्ही काय मिळवता. कपटी, स्वार्थी मित्र ओळखायला शिका.

खऱ्या मित्राची ओळख आर्थिक व्यवहारातून होते. एखाद्याला मित्र म्हणून स्वीकारताना तो इतरांशी कसा वागतो? आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत तो बेशिस्त नाही ना, याची काळजी घ्या आणि मगच मैत्री करा. अनेक जण मैत्रीला भावनेत गुंतवून, आयुष्यभर गोंजारत मनाचे समाधान मानण्यात धन्यता मानतात. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. परस्परांना उत्कर्षाकडे घेऊन जाणारी मैत्री हवी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com