Sugarcane Harvesting : मशिनचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक

ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यावर पर्याय म्हणून प्रत्येक कारखान्याने ऊस तोडणी मशिन मागवल्या.
Sugarcane Harvesting
Sugarcane HarvestingAgrowon

पोपट पाटील

Sugarcane Crushing Season : आतापर्यंत शेतकऱ्यांकडून ऊसतोड मजूर ऊस तोडणीकरिता पैसे मागत होते. हातभार म्हणून शेतकरी काही पैसे देतही होते.आज रोजी तोच पायंडा ऊस तोडणी मशिन मालकांनी पाडून शेतकऱ्यांना लुबाडायला सुरवात केली आहे. या मशिनचे मालक धनदांडगे आहेत. त्यांच्याकडूनही लुबाडणूक सुरू झाल्याने शेतकरी आता हतबल झाला आहे.

कारखान्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असता मशिनचे मालक कारखान्याच्या कारभाऱ्यांशी संबंधित असल्याने त्यांची दखल घेतली गेलेली नाही. जिल्ह्यात ८० ते ८५ लाख टन उसाचे गाळप दरवर्षी होत आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

त्यामुळे ऊस तोडणी मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यावर पर्याय म्हणून प्रत्येक कारखान्याने ऊस तोडणी मशिन मागवल्या. भविष्यात ऊस तोडणी मशिनशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती यायला लागली आहे. उसाचे क्षेत्र अधिक आहे. हंगाम कमी काळात संपवावा, आपला ऊस लवकर तुटून जावा, म्हणून शेतकरी धडपडत असतो.

Sugarcane Harvesting
Sugar Production : देशात २६० लाख टन साखर उत्पादन; ६१ कारखान्यांची धुराडी बंद

या धडपडीचा फायदा ऊस तोडणी मजुरांनी आधी घेतला होता. ते एकरी ३ ते ४ हजार रुपये घेत होते. ऊस तोडणी मशिन आल्यानंतर आता मशिनवालेसुद्धा लाच मागत आहेत. एकरी ३ ते ५ हजार रुपये लाच मागितली जात आहे.

साखर आयुक्तांनी याबाबत कारखान्यांना आदेश काढले होते. कोणी शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीकरिता पैसे घेतले तर त्यांच्या तोडणी मजुरीतून कपात करून संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावेत. या आदेशाला सातत्याने केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. आता तक्रार कोणाकडे करावयाची, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.

पैसे मागतात ते योग्यच?

दरम्यान, ‘सकाळ’ने एका कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी, गटाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ऊस तोडणी मशfनला ॲडव्हान्स देत नसल्याने ते पैसे मागतात. ते योग्यच आहे, असा धक्कादायक खुलासा केला.

Sugarcane Harvesting
Sugar Production : राज्यात पुढील वर्षी उसासह साखर उत्पादन वाढणार
ऊस तोडणी मशिनला कारखाना टनाला ४२५ रुपये भाडे देत आहे. ऊस उत्पादकांनो, ठाम राहा. ऊस शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांनी एकजूट केली पाहिजे. कोणालाही पैसे देऊ नका. आपोआप मशिन ऊस तोडून नेईल.
सूर्यकांत दळवी, कार्यकारी संचालक, कृष्णा साखर कारखाना, रेठरे (ता. कऱ्हाड)
ऊस तोडणीचे मशिन चालक पैसे मागत असेल तर शेतकऱ्यांनो, ऊस तोड घेऊ नका. कारखान्यास तत्काळ संपर्क साधा. न पैसे घेता आम्ही तुमचा ऊस कारखान्यास पाठवण्याची व्यवस्था करू.
आर. डी. माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू साखर कारखाना, साखराळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com