Sugar factory : थोरात साखर कारखान्याकडून ऊस पिकासाठी विविध योजना

संगमनेर तालुक्यातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ५१ हजार टन उच्चांकी गाळप केले आहे.
Sugar factory
Sugar factoryAgrowon

Sahakar Maharshi Bhausaheb Thorat Sahakar Sugar Factory : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाने (Sugar Factory) कार्यक्षेत्रात एकरी उत्पादन वाढीकरिता, ऊस बेणे, अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत, पेप्सी लॅटरल यांसह विविध योजना सुरू केल्या असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

या योजनेबाबत अधिक माहिती देताना ओहोळ पुढे म्हणाले, की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ५१ हजार टन उच्चांकी गाळप केले आहे.

Sugar factory
Sharad Pawar Sugar: साखर कारखाना नीट चालवण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष भलतीकडेच... शरद पवारांचा टोला

या वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर पाऊस झालेला असल्यामुळे कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता चांगली आहे.

संचालक मंडळाने १ जानेवारी २०२३ नंतर सुरू ऊस लागवड व खोडवा निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी ५० टक्के अनुदानावर अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत तसेच १ जानेवारी २०२३ पासून पुढे सुरू ऊस लागवडीसाठी १०,००० बेणे रक्कम वसुलीच्या अटीवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर २०२३-२०२४ ऊस गळित हंगामासाठी दि. १९ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू ऊस लागवडी करतील त्यांना १ रुपये प्रति रोपाने ऊस रोप देण्यात येणार आहे.

तसेच २०२३-२४ करिता नोंद केलेल्या अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४००० मीटर पर्यंत पेप्सी लॅटरल मागणी केल्यास वसुलीच्या अटीवर उधारीने पेप्सी लॅटरल देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीकरिता कारखाना शेती ऑफिस किंवा गट ऑफिस येथे संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com