Maharudra Manganale: म्हणून माणसांपेक्षा फळझाडं मला प्रिय आहेत...

झाडं अन् मी तासनतास एकमेकांकडं पाहतो. प्रेम, जिव्हाळा त्यांनाही व मलाही कळतो. त्यांना हवं होतं अन्न आणि पाणी, ते मी दिलं. स्वच्छ हवा व सुर्यप्रकाश इथं मुबलक आहे. तो त्यांनी घेतला.
Tree
Tree Agrowon

Fruit Tree आयुष्यभर सांभाळलेला माणूस, नातेवाईक कधीही शत्रू होऊ शकतो, मन:स्ताप देऊ शकतो. माणसं अपवादानेच चांगली वागतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे.

पण झाडं मात्र तुमच्या चांगूलपणाला दहापटीनं प्रतिसाद देतात. काही वर्षांपूर्वी आम्ही या जमिनीत फळझाडांची रोपटी (Fruit Tree) लावत होतो. तेव्हा, काहीजण बोलून गेले. लईच मुरमाड रान हाय.. इथं काय झाडं येतेत बाबा. मी हसून गप्प राहिलो... पण तेव्हापासून मी या रोपट्यांना इंचा-इंचानी वाढताना पाहतोय...

Tree
Maharudra Mangnale: उन्हाळ्यातली पानझड

झाडं अन् मी तासनतास एकमेकांकडं पाहतो. प्रेम, जिव्हाळा त्यांनाही व मलाही कळतो. त्यांना हवं होतं अन्न आणि पाणी, ते मी दिलं. स्वच्छ हवा व सुर्यप्रकाश इथं मुबलक आहे. तो त्यांनी घेतला.

Tree
Maharudra Manganale : व्हिएतनाममधलं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं स्वप्नातलं गाव

दुसऱ्याच वर्षी अंजीराच्या झाडांनी फळं दिली. यावर्षी बाजारातले अंजीर खाण्याची गरज भासली नाही. पेरू, मोसंबीना भरपूर फळं लागली.

दोन झाडांना आवळे लागले होते. लिंबूही लगडले. डाळींबही खाल्ले. नारळांना, आंब्याला यावर्षी चांगली फळं लागली.

या झाडांसाठी मी फार काही न करताही ते किती भरभरून देताहेत... हा मोठा फरक आहे माणसात आणि झाडांत..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com