Development Work Fund : दक्षिण सोलापूरला विविध विकास कामांसाठी दोनशे कोटींचा निधी

गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे थांबली होती. पण आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्याला दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळाला आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Solapur News : गेल्या अडीच वर्षांत राज्यात विकासकामे थांबली होती. पण आता भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्याला दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळाला आहे. यापुढेही आणखी निधी आणू, असे आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर तालुक्यात विविध ठिकाणी विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आमदार देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी आमदार देशमुख बोलत होते.

सरपंच विलास राठोड, उपसरपंच राहुल पुजारी, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी जिप पक्षनेते अण्णाराव बाराचारे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, प्रशांत कडते, बाळासाहेब घोडके, सिद्धराम बिराजदार, बसवराज बिराजदार, भीमराय व्हनमाने आदी उपस्थित होते.

Rural Development
Subhash Bhamre : अतिवृष्टीमुळे पीकहानी संबंधी खासदार भामरेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

आमदार देशमुख म्हणाले, की प्रत्येक गावातील रस्ते, पिण्याचे पाणी यावर आपला अधिक भर राहिला आहे. पायाभूत सुविधा मिळायलाच हव्यात.

आता भूमिपूजन झालेली कामे लवकरच पूर्णत्वास जातील, यापुढेही तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणून दक्षिण तालुका सुजलाम् सुफलाम् करू, असे आश्‍वासन आमदार देशमुख यांनी या वेळी दिले.

...या कामांचे झाले भूमिपूजन

भंडारकवठे येथील फीडर २४ तास सुरू करण्याच्या कामाचा या वेळी प्रारंभ करण्यात आला. तसेच मंद्रूप येथील सीतामाई तलावास बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी कुरुल कॅनॉलला मुख्य दरवाजा बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

तसेच वडकबाळ येथील कट्टव्वादेवी मंदिर परिसरात सीना नदीपासून घाट बांधणे व परिसर सुशोभित करण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्याशिवाय तेलगाव येथे हर घर नल योजनेतील पाणीपुरवठा कामाचे उद्‌घाटनही आमदार देशमुख यांच्याहस्ते झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com