Mathadi Worker : धुळ्यात माथाडी कामगारांचा निधी थकला

मागणीसाठी मापाडी (तोलणार) कामगारांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयात १२६ दिवस धरणे आंदोलन केले.
Mathadi Worker
Mathadi Worker Agrowon

Dhule News : शहरालगत मोराणे शिवारातील प्रताप नाना महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात नोंदणीकृत (Onion Procurement Center) कामगारांना काम मिळावे आणि माथाडी मंडळाकडून (Mathadi Board) लेव्हीसह ५६ लाख ६२ हजार १५० रुपयांची थकीत मजुरी मिळावी यासाठी मापाडी (माथाडी) कामगार संघटनेने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सरकारी यंत्रणेकडून हा तिढा कसा सोडविला जातो याकडे सर्वांचे लक्ष असेल.

संघटनेचे अध्यक्ष कैलास शिंदे यांनी पत्रकाद्वारे सांगितले, की मागण्यांबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे, की प्रताप नाना महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात कामाची मोलमजुरी मिळून झालेल्या लेव्हीची ५६ लाख ६२ हजारांची रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

Mathadi Worker
Onion Rate : कांदा प्रश्नावर राहुरीत आज ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

ही रक्कम माथाडी मंडळात जमा होणे आणि तिचे नोंदणीकृत मापाडी कामगारांना वाटप होणे आवश्यक होते; परंतु दखल घेतली जात नाही.

पैसे वसुलीचा प्रश्‍न

मागणीसाठी मापाडी (तोलणार) कामगारांनी माथाडी मंडळाच्या कार्यालयात १२६ दिवस धरणे आंदोलन केले. यादरम्यान माथाडी मंडळाच्या सचिवांनी मंडळास प्राप्त अधिकारानुसार जमीन महसूल अधिकारांतर्गत वसुली प्रक्रिया सुरू केली.

याबाबत २० ऑक्टोबर २०२२, तसेच १० नोव्हेंबर २०२२ आणि ४ जानेवारी २०२३ ला सुनावणी झाली. यानंतर तरतुदीनुसार वसुलीची पुढील प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविणे गरजेचे होते.

Mathadi Worker
Mathadi Labor Strike : नाशिक जिल्ह्यात माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप
मापाडी कामगारांची मागणी रक्कम ही पडताळणी करूनच दिली जात असते. त्यासाठी काम केल्याचा ठोस पुरावा लागतो. हजेरी बुक पूर्ण लागते. अशा बाबींची पूर्तता झाली की मागणी रक्कम देता येऊ शकते. यातील त्रुटींमुळे अंमलबजावणीला विलंब लागत आहे. प्रताप महाले या खासगी बाजार समितीने नोंदणीकृत मापाडी कामगारांना काम दिले पाहिजे. त्यांना कामावर घेतले पाहिजे. अनेक दिवसांपासून हा तिढा कायम आहे. तो सुटण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.
अ. ज. रुईकर, सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव, माथाडी मंडळ, धुळे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com