गौतम अदानी बनले जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती

भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Gautam Adani
Gautam AdaniAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bil Gates) यांना मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती (Richest Person) बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. अदानी यांनी अंबानी यांना आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून मागे टाकले.

Gautam Adani
कारवाईच्या इशाऱ्यानंतर अदानी पॉवर कंपनी वीज देण्यास तयार

साठ वर्षीय बिझनेस टायकूनची एकूण संपत्ती गुरुवारी ११५.५ अब्ज डॉलर झाली आणि बिल गेट्स १०४.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह यादीत खाली घसरले. ९० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी यादीत दहाव्या स्थानावर आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क, जे सध्या ट्विटर विकत घेण्याचा करार तोडल्यानंतर वादात सापडले आहेत, त्यांची एकूण संपत्ती २३५.८ अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी छोट्या कमोडिटीच्या व्यवसायांना बंदरे, खाणी आणि हरित ऊर्जा क्षेत्रात पसरवून मोठ्या समूहात रूपांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अदानी समूहाचे काही शेअर्स गेल्या दोन वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत, जे त्यांच्या हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील त्यांच्या नियोजनाला चालना देणारे आहेत.

पंतप्रधान मोदी २.९ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याच्या दिशेने काम करत आहेत आणि २०७० पर्यंत भारताला शून्य-कार्बन राज्य बनवण्याचे लक्ष्य पूर्ण करत आहेत, असे वृत्त ब्लूमबर्गने अलीकडेच दिले आहे. ब्लूमबर्गने नुकताच हा अहवाल दिला जेव्हा त्यांनी (गौतम अदानी) अंबानी यांना आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून मागे टाकले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com