गावरान आंब्यांचा दरवळ सरू

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्यांत हापूस आंब्‍याच्या व्यावसायिक लागवडींबरोबरच स्थानिक रायवळ, गावरान आणि केशर आंब्याची पारंपरिक लागवड आहे. हा आंबा मॉन्सून दाखल झाल्यानंतर पाडाला लागून पिकण्यास सुरूवात होतो.
गावरान आंब्यांचा दरवळ सरू
MangoAgrowon

पुणेः कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम संपला आहे. पुणे बाजार समितीत जिल्‍ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील गावरान हापूससह रायवळ आणि गावरान आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. विविध वाणांच्या सुंगधामुळे आंबा बाजारात दरवळला होता.

‘‘पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्यांत हापूस आंब्‍याच्या व्यावसायिक लागवडींबरोबरच स्थानिक रायवळ, गावरान आणि केशर आंब्याची पारंपरिक लागवड आहे. हा आंबा मॉन्सून दाखल झाल्यानंतर पाडाला लागून पिकण्यास सुरूवात होतो. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात आवक सुरू होऊन, साधारण जुलै अखेरपर्यंत असे दोन महिने हंगाम सुरू असतो,’’ असे गावरान आंब्याचे आडतदार तात्या कोंडे यांनी सांगितले.

पुणे बाजार समितीच्या गावरान आंबा बाजार विभागात रविवारी (ता.१२) हापूस आंब्यासह कैरी आणि विविध वाणांच्या आंब्यांचे सुमारे ८ हजार पाट्या आणि क्रेटची आवक झाली. या वेळी हापूसला प्रति डझनला १०० ते ६०० रुपये दर मिळाला. तर पायरीला ६० ते २००, गावरान २०-१०० आणि केशरला प्रति किलोला ४० ते ८० रूपये दर मिळाला.

गावरान आंब्याचे आडते युवराज काची यांच्याकडील लिलावामध्ये गावरान हापूसला प्रति किलोला उच्चांकी १५१ रुपये दर मिळाला. एका किलोमध्ये साधारण ४ आंबे बसतात. या हिशोबाने डझनला सुमारे ६०० रुपये दर मिळाल्याचे काची यांनी सांगितले.

‘‘माझ्याकडे हापूस, रायवळ आणि केशरची प्रत्येकी ५० झाडे आहेत. रविवारी (ता.१२) घरी आढी लावलेल्या हापूसच्या पिकलेल्या आंब्यांचे ३ क्रेट विक्रीसाठी आणले. या वेळी हापूसला प्रतिडझन २००, तर गावरान आंब्याला २० ते ५० रुपये दर मिळाला. महिनाभर हंगाम चालेल.’’

- रघुनाथ शिळीमकर, रा. मंजाई असनी, ता. वेल्हा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com