संशोधनासाठी गरजेनुसार घ्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत:गडकरी

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागांतून कलमांचा पुरवठा झाला. परंतु योग्य खुंटावर ती बांधण्यात आली नव्हती. त्यामुळे संत्रा बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला व बागांचा ऱ्हास झाल्याचे आपण अनुभवले. त्यामुळे फळबागांमध्ये योग्य खुंटावर कलम बांधणी गरजेची आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon

नागपूरः ‘‘दर्जेदार आणि निर्यातक्षम शेतमाल, फळांच्या उत्पादनासाठी गरजेवर आधारित संशोधनाची गरज आहे. देशांतर्गत संशोधन संस्थांच्या आवाक्‍याबाहेर ते असेल, तर अशावेळी जागतिकस्तरावरील अशा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार करावेत. त्यांचे तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने पुढाकार घ्यावा,’’ अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या वतीने रोपवाटिकांधारकांसाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून रोपनिर्मिती तंत्रज्ञान हस्तांतर प्रकल्प राबविला जात आहे. रविवारी (ता.२६) राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन उपयोग नियोजन संस्थेच्या सभागृहात या प्रकल्पाचा उद्‌घाटन सोहळा झाला.

Nitin Gadkari
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रोत्साहन योजनेत समावेश करा

या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, ‘आयसीएआर’चे उपसंचालक डॉ. एस. के. चौधरी, डॉ. ए. के. सिंग, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, एनबीएसएस-एलयूपी संस्थेचे संचालक डॉ. ब्रह्मा द्विवेदी, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे, ‘महाऑरेंज’चे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे आदी उपस्थिती होते.

गडकरी म्हणाले, ‘‘अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागांतून कलमांचा पुरवठा झाला. परंतु योग्य खुंटावर ती बांधण्यात आली नव्हती. त्यामुळे संत्रा बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला व बागांचा ऱ्हास झाल्याचे आपण अनुभवले. त्यामुळे फळबागांमध्ये योग्य खुंटावर कलम बांधणी गरजेची आहे.’’

‘‘ग्राहकांची मागणी दर्जेदार शेतमाल आणि फळांची राहते. भारतीय फळांचा दर्जा नाही. त्यामुळे नाइलाजाने दिल्ली व इतर मोठ्या शहरातील अनेक जण विदेशी फळांचे सेवन करतात. अशा ग्राहकांची गरज भागविण्यासाठी दर्जेदार रोपांपासून दर्जेदार फळांच्या उत्पादनाचे उद्दिष्ट साधावे लागेल. त्यासाठी संशोधन व तंत्रज्ञानाचे हस्तांतरण हा घटक महत्त्वाचा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देखील यात सहकार्य घ्यावे,’’ असा सल्ला गडकरी यांनी दिला.

माजी संचालकांची खरडपट्टी

डॉ. मिलिंद लदानिया यांचा उल्लेख टाळत गडकरी यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे माजी संचालकांना वारंवार संत्रा बागायतदांरासाठी काहीतरी तंत्रज्ञान द्या, असे सांगत होतो. परंतु ते सकारात्मक नव्हते. त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळत अखेर मीच त्यांच्याशी बोलणे सोडून दिले, अशी स्पष्टोक्‍ती गडकरी यांनी दिली.

Nitin Gadkari
तेलंगणा सरकारला शेतकऱ्यांपुढे का झुकावं लागलं ?

सिंदी ड्रायपोर्ट होणार कार्यान्वित

बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. रस्ते मार्गाने त्या ठिकाणी संत्रा निर्यातीत अनेक अडचणी येतात. त्या पार्श्‍वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा पर्याय देण्यात आला आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत तो कार्यान्वित होईल. यातून विदर्भातील कापूस, संत्रा तसेच इतर शेतीमालाच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,’’ असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्‍त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com