घोडगंगाचा डिस्टलरी ,कोजन प्रकल्प नफ्यात

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकरी सभासद व कामगार वर्गाने वेळोवेळी कारखान्याला सहकार्य केले असून, कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
घोडगंगाचा डिस्टलरी ,कोजन प्रकल्प नफ्यात
GhodgangaAgrowon

न्हावरे, शिरूर : मागील युती शासनाच्या काळात चुकीच्या धोरणामुळे वेळेत वीज खरेदी करार न झाल्याने घोडगंगा कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाला मोठा आर्थिक भुर्दंड बसला. आता कारखान्याचा डिस्टलरी व कोजन प्रकल्प नफ्यात असून, येत्या गाळप हंगामात कारखाना सुस्थितीत येईल, असा विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष व आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला.

न्हावरे (ता. शिरूर) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI) सदस्यपदी व पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शिरूर हवेलीचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष ॲड. अशोक पवार यांचा घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अशोक पवार हे बोलत होते. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, संचालक प्रा. सुभाष कळसकर, दिलीप मोकाशी, रामचंद्र नागवडे, प्रा. गोविंद निंबाळकर, वाल्मीक नागवडे, उत्तम सोनवणे, बाळासाहेब ढमढेरे, सुदाम साठे, राजेंद्र गावडे, कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष हर्षद माळवदकर, शेतकी अधिकारी किरण दोरगे, सुरक्षा अधिकारी संजय शितोळे, चीफ इंजिनिअर अविनाश ढेकाणे, विकास पाटील उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीच्या काळात शेतकरी सभासद व कामगार वर्गाने वेळोवेळी कारखान्याला सहकार्य केले असून, कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. शासनाच्या धोरणानुसार लवकरच कामगारांना १२ टक्के पगार वाढ देणार आहे. कारखान्यावर कोणत्याही वित्तीय संस्थांचे कर्ज थकीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश ढवळे, प्रास्ताविक महादेव मचाले यांनी केले. तर आभार मच्छिंद्र इंगळे यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com