Parbhani Market Committee : परभणी बाजार समितीच्या सभापतिपदी घुले

Agriculture Produce Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) पंढरीनाथ घुले यांची तर उपसभापतिपदी (कॉंग्रेस) अजय चव्हाण यांची सोमवारी (ता.२२) बहुमतांनी निवड झाली.
Parbhani Market Committee
Parbhani Market CommitteeAgrowon

Market Committee In Parbhani : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) पंढरीनाथ घुले यांची तर उपसभापतिपदी (कॉंग्रेस) अजय चव्हाण यांची सोमवारी (ता.२२) बहुमतांनी निवड झाली.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी सभापती व उपसभापती निवडीसाठी पीठासीन अधिकारी माधव यादव यांच्या अध्यक्षेत सोमवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

विहित कालावधीत सभापतिपदासाठी महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट)चे पंढरीनाथ घुले व भारतीय जनता पक्षाचे राजेश देशमुख यांनी तर उपसभापतिपदासाठी कॉंग्रेसचे अजय चव्हाण व भारतीय जनता पक्षाचे सुरेश भूमरे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

Parbhani Market Committee
Paithan Market Committee : पैठण बाजार समितीच्या सभापतिपदी राजू नाना भुमरे

कुणीही माघार घेतली नाही. त्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले. सभापतिपदासाठी घुले यांना १४ तर देशमुख यांना ४ मते मिळाली. उपसभापतिपदासाठी चव्हाण यांना १४ तर भुमरे यांना ४ मते मिळाली. पीठासीन अधिकारी यादव यांनी सभापतिपदी पंढरीनाथ घुले व उपसभापतिपदी अजय चव्हाण यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

निवड प्रक्रियेत सहकार अधिकारी अश्विनी निकम, गोविंद कदम, शैलेंद्र कन्सटवाड यांच्यासह सचिव संजय तळणीकर यांचे सहकार्य मिळाले.

सभापतिपदी घुले व उपसभापतिपदी चव्हाण यांची निवड झाल्यानंतर खासदार संजय जाधव, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांचा केला. निवडीनंतर समर्थक कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनेलला १२ जागा, भाजपा पुरस्कृत पॅनेलला ४ जागा तर अपक्षांना २ जागा मिळाल्या होत्या. सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत दोन अपक्ष संचालकांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले.निवडणुकीपूर्वी जाहीर केल्यानुसार सभापतिपद शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आले तर उपसभापतिपद कॉंग्रेसकडे राहिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com