Ginger Cultivation Management : आले लागवड नियोजन रब्बी हंगामापासून करावे

आले पीक लागवडीचे नियोजन हे रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. आले पिकांस बिवड व कुजलेले शेणखत महत्त्वाचे असते.
Ginger Cultivation
Ginger Cultivation Agrowon

Satara Agriculture News : आले पीक लागवडीचे नियोजन हे रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून करणे आवश्यक आहे. आले पिकांस बिवड व कुजलेले शेणखत महत्त्वाचे असते, यासाठी आले लागवड करणाऱ्या क्षेत्रात सहा महिने अगोदर शेणखत टाकावे तसेच हरभरा, सोयाबीन, भुईमूग, कडधान्यासारख्या पिकांच्या बिवडावर आल्याची लागवड करावी, असे प्रतिपादन खोजेवाडी कृषी सहायक अकुंश सोनावले यांनी केले.

एकंबे (जि. सातारा) येथे ‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त अयोजित आले पीकविषयी ‘ॲग्रो संवाद’मध्ये श्री. सोनावले बोलत होते. या वेळी कृषी अधिकारी अर्जुन साळुंखे, आबा शिंदे, पोलीस पाटील विकास शिंदे, अरविंद शिंदे, ‘सकाळ’ वितरण व्यवस्थापक अजिंक्य करपे, ‘ॲग्रोवन’ जिल्हा प्रतिनिधी विकास जाधव, यारा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सुनील भोसले आदी उपस्थित होते.

Ginger Cultivation
Ginger Market Rate : आले पिकांस प्रतिगाडीमागे पाच हजार रुपयांची वाढ

श्री. सोनावले म्हणाले, की आले बियाणे ढेप लावताना कडूलिंबाचा पाल्याचा वापर करावा यामुळे पुढे मुळकुंजीचा धोका कमी होण्यास मदत होते. आले पिकांच मुळकुंज, कंदमाशीबरोबर आता हुमणीपासून मोठी हानी होत आहे.

यासाठी आतापासून उपाययोजना सुरू केल्यास हुमणीचा धोका कमी करता येऊ शकतो. आले लागवडीवेळी रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करावी. कंदमाशीसाठी पिवळे, निळे चिकट सापळ्याचा वापर करावा.

आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमित केल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. आल्यास कंदकुज लागल्यास त्या स्पॅाटला सलग तीन दिवस आळवणी करा. आले पिकवण्यास शेतकरी कष्ट मोठ्या प्रमाणात करत असतात, मात्र विक्री व्यवस्थेत शेतकरी मागे पडत असल्याने दर कमी घ्यावा लागत आहेत.

विक्री व्यवस्थेसाठी शेतकरी बचत गट, शेतकरी कंपन्यांनी पुढे आल्यातर आले निर्यात करता येऊ शकते. आल्यावर थोडे काम करून आले निर्यात केली जात आहे. शेतकरी निर्यातीस पुढे आल्यास आले पिकास चांगला दर व परदेशी बाजारपेठ मिळवता येईल.

‘अॅग्रोवन’ हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून सतत शेतकऱ्यांना नवीन देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुनील भोसले यांनी यारा कंपनीची उत्पादने व त्यांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. अर्जुन साळुंखे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com