Nagar News : विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होणे गरजेचे ः थोरात

मुलींनी स्वावलंबी बनण्यासाठी बचतगट, कौशल्यप्राप्ती यांसारख्या मार्गांचा अवलंब करावा.
Nagar News
Nagar NewsAgrowon

Nagar News : महिलांचे सामाजिक वास्तव आजही काळजी करण्यासारखे आहे. त्याला तोंड देण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वतः आत्मनिर्भर (Aatmnirbhar) होणे गरजेचे असल्याचे मत एकवीरा फाउंडेशनच्या (Ekvira Foundation) अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालय, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निर्भय कन्या अभियानप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते.

थोरात म्हणाल्या, की मुलींनी स्वावलंबी बनण्यासाठी बचतगट, कौशल्यप्राप्ती यांसारख्या मार्गांचा अवलंब करावा. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन जीवनात निर्भयतेने क्रांतिकारक बदल घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Nagar News
Sugar factory : थोरात साखर कारखान्याकडून ऊस पिकासाठी विविध योजना

संगमनेरच्या माताभगिनी दूध, भाजीपाला पिकवून पुणे, मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात, मात्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, असे सांगत उत्तम आरोग्यासाठी चौरस आहार, हिरव्या पालेभाज्यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, की विद्यार्थिनींनी आपल्या समाजाचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सक्षम व कृतिशील व्हावे.

निर्भय कन्या अभियान राबविणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ असून, मुलींनी भयगंड, अहंगंड, न्यूनगंड यातून बाहेर येण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्याची आवश्यकता आहे.

Nagar News
Nagar Agricultural Festival : नगर महोत्सवात तीन दिवसांत सुमारे सव्वाचार कोटींची उलाढाल

यावेळी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. नवनाथ नागरे, निर्भय कन्या अभियानच्या समन्वयक प्रा. रोहिणी जाधव, प्रा. मोहिनी काशीद, डॉ. स्वाती ठुबे, प्रा. कोमल म्हस्के, प्रा. वैशाली शिंदे, प्रा. सीमा मोरे, प्रा. अनुजा आभाळे, प्रा. गीता नवले, प्रा. आरती घुले, मीना गोसावी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सविता तांबे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com