हरभरा उत्पादकांना एक हजार रुपये फरक द्या

केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे डॉ. भुसारी यांची मागणी
हरभरा उत्पादकांना एक हजार रुपये फरक द्या
Chana ProcurementAgrowon

अकोला ः ‘‘हरभऱ्याची हमीभाव (Chana MSP) खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारने हजार रुपये भाव फरक द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर (Narendra Singh Tomar) यांच्याकडे केली.

भुसारी यांनी म्हटले, की राज्यातील शेतकऱ्यांना यंदा हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन (Record Chana Production ) झाले. या उत्पादित मालाला योग्य भाव (Chana Rate) मिळणे ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी नाफेडद्वारे होत असताना दोन जूनला ती बंद केली. यापूर्वी कुठलीही पूर्वसूचना न देता २३ मे रोजी अशीच अचानक खरेदी बंद करण्यात आली होती. राज्य व केंद्र सरकारने २९ मेला नवीन आदेश काढून १८ जूनपर्यंत खरेदी सुरू राहील, असे जाहीर केले होते. मात्र गुरुवारी (ता.२) पुन्हा नाफेडची हरभरा खरेदी बंद करण्यात आली. यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र सरकारने प्रति क्विंटल हजार रुपये भाव फरक देऊन शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

येत्या दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यामुळे हरभऱ्यात आर्द्रतेचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वजनात फरक पडतो. शिवाय गोदामात कडधान्य साठवणुकीच्या अडचणी निर्माण होतात. प्रतिक्विंटल हरभरा खरेदीमागे साठवणूक, हमाली, भाडे, वाहतूक खर्च, कर्मचारी खर्च यात जवळपास सहाशे ते सातशे रुपये खर्च होतात. यात सरकारचे नुकसानच अधिक आहे. सरासरी विचार करता शासकीय खरेदी करण्याचा अट्टहास न धरता सरळ सरळ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात भाव फरक जमा करणे फायद्याचे ठरेल, असेही डॉ. भुसारी यांनी सुचवले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com