Onion Producer : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्या

Onion Crop Damage : अकोला जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. लागवडीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात आलेला नाही.
Onion Producers
Onion ProducersAgrowon

Akola Crop Damage Update : अकोला जिल्ह्यात गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. लागवडीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात आलेला नाही. शासनाने कांदा उत्पादक नुकसानग्रस्तांना एकरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या मागणीसाठी पक्षाच्या नेत्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नंतर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले.

शासनाने हमीभाव घोषित करताना एक फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विक्री झालेल्या कांद्यालाच ३५० रुपये हमीभाव दिला. हमीभाव घ्यायचा असेल, तर बाजार समितीच्या विक्री पावतीचा पुरावा व ७/१२ मागितला.

त्यामुळे आधीच उशिरा पेरणी केलेला कांदा ३१ मार्च नंतर बाजारात आला व मार्चनंतर लगेच एप्रिल आणि मेमध्ये गारपीट व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील एक हजार ५०० एकर कांदा मातीमोल झाला.

Onion Producers
Onion Producer Farmer : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार गावित यांच्यासमोर मांडल्या व्यथा

पातूर तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाला एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च लावला. त्याचा रुपयाही शेतकऱ्यांच्या नशिबी आलेला नाही.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अन्यथा पुढील वर्षी खरीप हंगाम आम्ही करणार नाही, अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दिले.

निवेदन देतेवेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, शहराध्यक्ष शेख मुख्तार, माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तायडे, माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुऱ्हान, सय्यद कमरुद्दीन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन बोमटे, पूजा काळे, अर्चना राऊत, रजनी पुंडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com