गौरव मानवजातीचा !

भारतातील कृतिशील तत्वज्ञांमध्ये ज्यांचा क्रमांक फार वरचा लागतो असे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले ऊर्फ ‘दादा’ यांचा जन्मदिन १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Human Chain
Human ChainAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

भारतातील कृतिशील तत्वज्ञांमध्ये ज्यांचा क्रमांक फार वरचा लागतो असे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले ऊर्फ ‘दादा’ यांचा जन्मदिन १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वाभिमान गमावलेल्या, हीन-दीन तसेच केवळ लाचारी करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता समजणाऱ्‍या लोकांना स्वाभिमानाचं महत्त्व कधी समजेल का? त्यांना स्वतःबद्दल गौरव वाटेल का? ही दादांची व्यथा होती.

Human Chain
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

स्वाभिमाने परिपूर्ण असं जीवन कुणाला जगावसं वाटणार नाही? दादांची दुसरी एक व्यथा होती की उच्चवर्णीय आहे म्हणून त्याला समाजात सन्मान आणि अन्यवर्णीय आहे म्हणून त्याचा अपमान? हे काही योग्य नाही. समाजात फक्त वित्तवान, सत्तावान, ज्याच्याकडे चांगले शिक्षण आहे यांनीच गौरवपूर्ण जगायचं का? ज्यांच्याकडे वरीलपैकी काहीच नाही त्यांनी ते नाही म्हणून लाचारीचं जीणं जगायचं का? ज्यांच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता शिक्षण असं काहीच नाही त्यांनी कशाच्या जोरावर गौरवपूर्ण जगावं? अशी कोणती गोष्ट आहे, की ज्यामुळे या वर्गाचा पाठीचा कणा ताठ होईल. ती गोष्ट म्हणजे ‘मी प्रभूचा अंश आहे’ हे ते गौरवाचे कारण आहे.

भक्ती ही एक मोठी सामाजिक शक्ती आहे. दादांनी भक्तीमधील लाचारीही दूर केली. आत्मगौरवात मी छोटा नाही, हलका नाही ही समज व्यक्तीमध्ये उभी राहते. समाजात वित्तवान लोक जसे दानधर्म करतात तसं मला करता येत नाही या विचाराने ही मनुष्य स्वतःला हलका समजू शकतो. दादांनी या गोष्टीवर चिंतन केले होते. त्यानंतर विविध प्रवृत्तींद्वारे मनुष्यातील ही लाचारी सुरू कशी होईल, यावर काही प्रयोग केले. मनुष्य स्वतःच्या कर्मावरचा मालकी हक्क सोडू शकत नाही, असा बर्ट्रांड रसेलच्या प्रश्‍न होता.

कार्ल मार्क्स म्हणतो की अपौरूषेय वित्त (कुणाचीही मालकी नसलेले) कुणी उभं करू शकत नाही म्हणून दादांनी या दोन्ही विचारवंतांना आपल्या विविध प्रयोगातून उत्तरे दिली. या प्रयोगातूनही लोकांमध्ये गौरव उभा राहिला. उदा. ‘योगेश्‍वर भावकृषी’ सारखा प्रयोग आहे. त्यात जी व्यक्ती नांगरायला जाते ती पेरायला जात नाही. जी खुरुपणी करायला जाते ती सोंगणीला जात नाही. जी काढणीला जाते ती विक्रीला जात नाही.

त्यामुळे या प्रयोगातून निर्माण झालेलं धान्यावर कुणाचाच अधिकार असत नाही. अशी अपौरूषेय लक्ष्मी निर्माण करण्यात आपलाही वाटा आहे, यानेही सर्वसामान्यांना गौरव वाटतो. असा आत्मगौरव आणि परसन्मान मनुष्यांमध्ये उभा करणाऱ्या पांडुरंग शास्त्री आठवले ऊर्फ दादांचा जन्मदिवस हा स्वतःचा जन्मदिवस म्हणून साजरा न करता तो अखिल मानवजातीचा गौरव म्हणून साजरा करण्यात यावा यातच त्याची महत्ता दिसून येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com