Agrowon podcast : ‘ॲग्रोवन डिजिटल’चा सोनेरी गौरव

दिल्लीतील परिषदेत ‘पॉडकास्ट’ला ‘वॅन-इफ्रा’चे सुवर्णपदक प्रदान
Agrowon podcast
Agrowon podcastAgrowon

नवी दिल्ली, ता. १६ ः वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूज पब्लिशर्स (WAN-IFRA) तर्फे सकाळ माध्यम समूहाच्या ‘ॲग्रोवन’च्या ‘शेत मार्केट’ या पॉडकास्टला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

येथे गुरुवारपासून (ता. १६) सुरू झालेल्या दक्षिण आशियाई देशांच्या ‘डिजिटल मिडिया इंडिया २०२३’ परिषदेत हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

या दोन दिवसीय परिषदेत भारत तसेच दक्षिण आशियातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ डिजिटल’चे बिझनेस हेड स्वप्नील मालपाठक, कन्टेट हेड विश्वास पुरोहीत यांनी हा सन्मान स्वीकारला.

‘वॅन इफ्रा’च्या दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक मग्दूम मोहंमद आणि मुख्य कार्यपालन अधिकारी थॉमस जेकब यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.

‘वॅन इफ्रा’ने २०२२ सालासाठीच्या विविध वर्गवारीतील दक्षिण आशियाई डिजिटल मिडिया पुरस्कारांची घोषणा अलिकडेच केली होती.

Agrowon podcast
Agrowon Podcast : नाफेडच्या खरेदीचा हरभरा बाजाराला आधार

माध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट पॉडकास्ट गटात सर्वोच्च सन्मान ‘ॲग्रोवन’च्या ‘शेत मार्केट’ पॉडकास्टला जाहीर झाला होता. शेतीमधले मार्केट इन्टेलिजन्स सांगणारे हे भारतातील पहिले पॉडकास्ट आहे.

एकूण १३ गटांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य असे तीन प्रकारचे पुरस्कार विविध माध्यमांना प्रदान करण्यात आले.

त्यासाठी विविध दक्षिण आशियाई देशांमधून प्रवेशिका आल्या होत्या. सुवर्णपदक विजेत्यांना WAN-IFRA तर्फे दिल्या जाणाऱ्या वर्ल्ड डिजिटल मिडिया ॲवार्डच्या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला आहे.

मुद्रित अंकाबरोबरच ‘ॲग्रोवन डिजिटल’ माध्यमातूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचतो आहे. एका क्लिकवर कृषी बाजारातील घडामोडी, दरातील चढ-उतार, महत्त्वाच्या बातम्या, तांत्रिक माहिती, चालू घडामोडींपासून ते शेती सल्ल्यापर्यंत सर्व अपडेट्स मिळतात.

‘ॲग्रोवन’ची वेबसाईट, ॲप, युट्यूब चॅनल, फेसबूक पेज, इन्स्टाग्राम आणि पॉडकास्ट यांवर ही माहिती उपलब्ध होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com