Road Theft : जेव्हा रातोरात गावचा रस्ताच चोरीला जातो...

जाऊ तिथं खाऊ सिनेमात आपला मक्या त्याची विहीर चोरीला गेली म्हणून कोर्टात केस करतो. कोणाचं काय चोरीला जाईल सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणाल हे फक्त पिक्चरमध्ये होतंय. पण तसं नाही. नुकताच बिहारमध्ये एक अख्खा रस्ता चोरीला गेलाय.
Bihar Rod Theft
Bihar Rod TheftAgrowon

अभिषेक बच्चन, राणी मुखर्जीचा बंटी और बबली बघितलाय काय? त्यात ती दोघं एका फॉरेनर माणसाला चक्क ताजमहल विकतात. जाऊ तिथं खाऊ सिनेमात आपला मक्या त्याची विहीर चोरीला (Well Theft ) गेली म्हणून कोर्टात केस करतो. कोणाचं काय चोरीला जाईल सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणाल हे फक्त पिक्चरमध्ये होतंय. पण तसं नाही. नुकताच बिहारमध्ये एक अख्खा रस्ता चोरीला (Bihar Road Theft) गेलाय. काय झालंय जरा विस्कटून सांगते.

झालंय असं की बिहारमध्ये बांका जिल्ह्यात खरौनी नावाचं एक खेडेगाव आहे. गाव आहे म्हटल्यावर माणसं आहेत, घरं आहेत, गाड्या आहेत तसंच रस्तेपण आहेत. त्यातला दक्षिणेकडचा एक रस्ता शेजारी असलेल्या खडमपुर गावाला जोडतो. आठवड्याभरापूर्वी २९ नोव्हेंबरला जेव्हा गावकरी सकाळी उठले तेव्हा दिसलं की गावात येणारा तो रस्ताच गायब झालाय.

Bihar Rod Theft
रस्ता नसल्याने पाच वर्षांपासून शेती पडीक

सुरवातीला खदमपुरला जाणाऱ्या गावकऱ्यांना वाटलं आपला रस्ता चुकलाय. पण नंतर उजाडल्यावर कळल की त्या रस्त्याच्या जागी तिथं एक शेत तयार झालंय. हा रस्ता म्हणजे काय पायवाट नाही तर चांगली दोन किलोमीटरची सडक आहे. अशा या सडकेवर कोणी तरी नांगरून ठेवलं आहे.

Bihar Rod Theft
पांदण रस्ता मोकळा करा, अन्यथा हेलिकॉप्टरची सुविधा द्या 

आता बिहार म्हटलं की असल्या गजब कथा ऐकायला मिळणार यात नवल असं काही नाही. आपल्या इथं नाही का शेत नांगरताना बांध कोरतात. उसाची तोडणी आली की आपले शेजारी ट्रॅक्टरसाठी रस्ता देत नाही. आपल्या शेतातून जाणारी वाट बंद करून शेजारच्या शेतकऱ्याची गोची केली जाते. पण ही भाऊबंदकी आपल्या इकडे झाली. पण चक्क रस्ता गायब करून रातोरात तिथं शेत तयार करायचं... ही असली चोरी फक्त बिहारीच करू जाणे.

खैरोनी गावातल्या कोणी तरी टग्या गुंडाने हा पराक्रम केलाय. आपल्याकडे बांध कोरतात, पण या पठ्ठ्याने तर ट्रॅक्टर लावून रस्ता चक्क नांगरला आणि त्यावर कडी म्हणजे तिथं गहू पेरला. त्या टग्याला घाबरून गावकरी आडमार्गाने खाचखळग्यातून काही दिवस गेले.

ज्यांनी विरोध केला त्यांना लाठीकाठीने मारहाण, धमक्या, शिवीगाळ असे प्रकार देखील झाले. पण किती जरी झालं तरी गावातून बाहेर पडायला रस्ता तर हवाच. शेवटी कोणी तरी धीर करून रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनात दाखल केली आहे. बिहार पोलिसांनी नेहमीप्रमाणे वेगाने या रस्ता चोरीच्या प्रकरणावर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे. गव्हाचं पीक हाती यायच्या आधी प्रशासन जागं होईल अशी आशा आहे. या सगळ्या गोंधळात खैरोनीच्या गावकऱ्यांना कधी रस्ता सापडतोय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल हे नक्की.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com