Government Subsidy : राजस्थान सरकार देणार शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदान

शेतकरी पिकाला प्राण्यांपासून वाचवण्यासाठी विविध शक्कल लढवत असतात. काही शेतकरी शेताला तारेचे कुंपण करण्याचा प्रयत्न करतात.
Government Subsidy
Government SubsidyAgrowon

शेतकऱ्यांच्या (Farmer Problem) पुढील अडचणी अजूनही पूर्णतः संपलेल्या नाहीत. एकीकडे हवामान बदलांचा (Climate Change) फटका शेतकऱ्यांच्या पिकांना (Crop Damage) बसतो तर दुसरीकडे सरकारच्या ग्राहकहित धोरणांमुळे शेतकरी कात्रीत धरला जातो तर तिसरीकडे उभ्या पिकाला प्राण्यांचा धोका असतो. त्यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होतो.

शेतकरी पिकाला प्राण्यांपासून वाचवण्यासाठी विविध शक्कल लढवत असतात. काही शेतकरी शेताला तारेचे कुंपण करण्याचा प्रयत्न करतात. पण क्षेत्र जास्त असल्यास संपूर्ण शेताला तारेचे कुंपण करणे शेतकऱ्यांला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

त्यामुळे राजस्थान सरकारने एक योजना राबवण्याचे ठरवले आहे. या योजने अंतर्गत पाच हजार शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी फळ सुरक्षा योजना राबवण्यात येत आहे.

राजस्थान सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री किसान साथी ही योजना राबवली. या योजनेतून पीक सुरक्षा मिशन नुसार शेतकऱ्यांना ४८ हजार रुपये किंवा ६० टक्के अनुदान राजस्थान सरकार शेतकऱ्यांना देते.

Government Subsidy
Onion Subsidy : शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे अनुदान

तर इतर शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी ५० टक्के अनुदान आणि ४० रुपये हजार रुपये मदत देण्यात येते. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राजस्थान सरकारने ३५ हजार शेतकऱ्यांसाठी २ वर्षात २५ लाख मीटर तार कुंपणासाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही रानडुक्कर, हरिण, माकड आणि इतर प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त असतात. राज्यातील शेतकरीही तार कुंपणाकडे वळत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com