Minister Atul Save : सहकाराला वैभव मिळवून देण्याचे काम शासन करेल : अतुल सावे

मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव उदय जोशी यांनी परिसंवादात भाग घेतला.
Pune News
Pune NewsAgrowon

Pune News : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम सहकाराने करूनही याची प्रतिमा समाजमनात वाईट होत आहे. हे टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करून सहकाराला वैभव मिळवून देण्याचे काम शासन करेल, अशी ग्वाही सहकारमंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी दिली.

‘सहकार सक्षमीकरणात राज्य सरकारची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात बँक प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar), सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव उदय जोशी यांनी परिसंवादात भाग घेतला. राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार क्षेत्रातील अडचणी व त्याविषयीची शासनाची भूमिका या विषयावर तज्ज्ञांना बोलते केले.

अतुल सावे म्हणाले, की सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी आम्ही अनेक धोरणे आखत आहोत. यामध्ये बँकांना उभारी देण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का? याबाबत चर्चा सुरू आहे.

अडचणीत असणाऱ्या बँकासोबत मागील सहा महिन्यांपासून चर्चा करत आहोत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील ९ बँका सध्या अडचणीत आहेत. अशा बँकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Pune News
Cooperation policy : समृद्धीकडे नेणारे सहकार धोरण

प्रवीण दरेकर म्हणाले, की आज सगळी धोरणे राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून ठरतात. या बँका सर्वसामान्यांची किती जवळच्या आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. सर्व सामान्यांच्या अडचणी सहकारी बँकाच सोडवू शकतात.

पण त्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. शासनाने आपले भाग भांडवल सहकारी बँकांमध्ये ठेवून सहकारी बँका सशक्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

उदय जोशी म्हणाले, की अडचणीत असणाऱ्या सहकारी बँकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे धोरण आणले जात आहे. अडचणीत असलेल्या बँकावर चांगल्या बँकेला प्रशासक म्हणून नेमावे यामुळे अडचणीत असणारी बँक त्यातून बाहेर येईल.

सहकारी संस्थांच्या सभासदांना प्रशिक्षण देण्यासाठी सहकार भारतीने खूप मोठे प्रयत्न केले आहेत.

‘सकाळ’ व्यासपीठ व्हावे

सहकारी संस्थेबाबतची एखादी चुकीची बातमी संबंधित बँकेला बदनाम करू शकते. पण वस्तुस्थिती मांडण्यासाठी माध्यमांनी व्यासपीठ उभारणे गरजेचे आहे. ‘सकाळ’ने यासाठी पुढाकार घेऊन व्यासपीठ उभारल्यास सहकारासाठी एक चांगली बाब ठरेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com