गुजरातमध्ये १ कोटी आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे, खते वाटपाचा संकल्प

गुजरात कृषी विभागाच्या पिक फेरपालट प्रकल्पाअंतर्गत ही योजना राबवण्यात येते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने यावर्षी १ कोटी २३ लाख आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प सोडला आहे.
गुजरातमध्ये १ कोटी आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे, खते वाटपाचा संकल्प
Krushi Vaividyakaran YojanaAgrowon

गुजरात सरकारने कृषी वैविध्य करण योजने (Krushi Vaividhyakaran Yojana) अंतर्गत २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात १ कोटी २३ लाख शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि खते वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गुजरात कृषी विभागाच्या पिक फेरपालट प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना राबवण्यात येते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने यावर्षी १ कोटी २३ लाख आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प सोडला आहे.

गुजरात कृषी विभागातर्फे एक दशकापासून राज्यात पीक फेरपालट प्रकल्प (Agricultural Diversification Project) राबवण्यात येत आहे. या प्रकल्पानुसार ही कृषी वैविध्य करण योजना राबवण्यात येते. मंगळवारपासून (दिनांक २४ मे) या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे व खते वाटपास सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यातील आदिवासी समूहातील शेतकऱ्यांचा एक मेळावाही आयोजित करण्यात आला.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मेळाव्यात सहभागी कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. २०१२-२०१३ पासून गुजरातमध्ये आदिवासी शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे व खतांचे वाटप करण्यात येत असून आतापर्यंत २.१ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाल्याचे पटेल म्हणाले. यावर्षी ही योजना १ कोटी २३ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

३२४० रुपयांचे अनुदानित बियाणे आणि खताचे एक किट योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला देण्यात येत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाने म्हटले आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला २५० रुपयांचे नाममात्र शुल्क भरावे लागते. गेल्या वर्षीपासून सेंद्रिय शेती (organic farming) करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. सेंद्रिय शेती (organic farming) करणाऱ्या आदिवासी समूहातील शेतकऱ्यांना दर्जेदार फळभाज्या अथवा मक्याचे बियाणे देण्यात येते तसेच डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) आणि सेंद्रिय खताची एक बॅग देण्यात येत असल्याचे पटेल म्हणाले आहेत.

या योजने अंतर्गत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वांगे, दुधी भोपळा, मका, टमाटे, कारले, भेंडीचे बियाणे देण्यात आलेले आहे. खतांमध्ये युरिया, एनपीके आणि सेंद्रिय खते वितरीत करण्यात आली आहेत. यावर्षी या योजनेचा विस्तार करण्यात येत असून राज्यातील आदिवासी समूहातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत ७६ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे व खतांचे किट वाटायला सुरुवात झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या सचिव डॉ. एस.एम. कृष्णा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. दरम्यान डांग जिल्हा हा नैसर्गिक शेती (natural farming) करणारा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला असल्याने या जिल्ह्यात योजने अंतर्गत नैसर्गिक खतांचे वाटप करण्यात येणार आल्याचेही कृष्णा यांनी नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com