
Gram Panchyat News : भूजगाव (ता. धडगाव) ग्रामपंचायतीत (Gram Panchyat) वेगवेगळे अभिनव प्रयोग नेहमीच राबविले जातात. सध्या अशाच एका प्रयोगामुळे येथील ग्राम पंचायतीचा निर्णय गाजत असून, त्याचा सर्वत्र बोलबाला आहे.
कारण, भूजगावमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत (Gram Sabha) गावातील लग्नांसाठी ग्राम पंचायतीकडूनच ना-हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतसमोर मोकळ्या मैदानात चक्क मंडप व ध्वनिक्षेपकही लावण्यात आला होता. ग्रामस्थांना प्रश्न मांडण्यासाठी स्वतंत्र माईक आणि पिण्याच्या पाण्याचीही सोय होती.
साधारणत: सहा तास चालेल्या ग्रामसभेत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात विविध समित्यांची मंजुरी, वृक्षारोपण, रोजगार, कुपोषण, हातपंप दुरुस्ती, जलजीवन मिशन योजनेची आणि शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
सर्व नागरिकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली. स्पीकरद्वारे ग्रामसभेची माहिती नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा धडगाव तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवर अजेंडा वितरित केला.
गावाच्या व्हॉटस्ॲप समूहावर संदेश पाठविण्यात आले. शिवाय पाडाविकास कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला निरोप दिला गेला. स्वतः सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ऑटो रिक्षावर लाउड स्पीकरद्वारे प्रत्येक पाड्यापर्यंत जनजागृती केली.
...असा आहे ठराव
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम लागू करण्याचा ठराव करतानाच हरणखुरी व भुजगाव बालविवाह बंदी क्षेत्र घोषित करण्यात आले.
त्यानुसार लग्न पत्रिका छापताना मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्याचे नमूद करणे, वधू- वराच्या वयाचा पुरावा ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक राहील. वयाचा पुरावा दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.