Gratitude : कृतज्ञतापाठ

ज्या चा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहात, तर तुम्ही कमकुवतच बनाल.
Gratitude
Gratitude Agrowon

ज्या चा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही कमकुवत आहात, तर तुम्ही कमकुवतच बनाल. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही बलवान आहात, तर तुम्ही बलवानच बनाल. हे महान वाक्य स्वामी विवेकानंद यांचे आहे. किती साधा, सोपा अर्थ आहे जीवनाचा, तरीही आपण स्वतःविषयी काळजीपूर्वक सकारात्मक विचार करतो का?

Gratitude
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

सकारात्मक विचारांना जोड हवी कृतज्ञतेची! छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. कुणी मदत केल्यावरच कृतज्ञताभाव ठेवायचा असे नाही, तर जर मदत केली नाही तरीही कृतज्ञ राहायचे. कारण हे एक आव्हान असते. आपण तितक्याच काळजीपूर्वक, सहजतेने हे आव्हान पूर्ण करायचे असते.

एखादी व्यक्ती आपल्याला त्रासदायक आहे. असे वाटते. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीविषयी सतत द्वेष उत्पन्न होतो. तरीही त्या व्यक्तीविषयी आपण कृतज्ञ राहायचे आहे. कारण ती व्यक्ती एकदा तरी आपल्याशी चांगल वागलेली असते. ते आठवून कृतज्ञता मानायला हवी. कारण ही कृतज्ञता त्या व्यक्तीला आणखी चांगले वागण्याची भावना जादूईरीत्या पूर्ण करते. अनुभव घेऊन पाहायला काय हरकत आहे.

घरात जर एखाद्याशी आपले जुळत नसेल तर त्यांच्याविषयी सतत आभार माना. उदा. बहीण आणि भावाचे भांडणे होत असतील तर एकमेकांनी, एकमेकांशी वागलेले चांगले प्रसंग आठवायचे. ताई तू मला या प्रसंगात खूप आधार दिला मी कृतज्ञ आहे! कृतज्ञ आहे!! कृतज्ञ आहे !!! बघा अद्‍भुत परिणाम तुम्हाला या वाक्यामुळे जाणवतील. आपण नेमकं काय करतो. समोरच्याविषयी सकारात्मक बोलण्याऐवजी नकारात्मकतेचा, तक्रारीचा पाढा वाचतो. आणि स्वतःच्या जीवनात दुःख ओढवून घेतो.

म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय छोट्या छोट्या गोष्टींपासून लावायला सुरुवात करणे हे आनंदाच्या दिशेने एक महान पाऊल उचलण्यासारखे आहे. शाळेतील बालकांवर दिवाळी सुट्टीनंतर असाच एक प्रयोग चालू आहे. छोट्याशा बॉक्सची कृतज्ञता पेटी तयार केली. आणि दररोज एका छोट्या कागदावर आभार मानणारे एक वाक्य लिहायचे व त्या पेटीत टाकायचे. परिपाठात त्या वाक्यांचे वाचन करायचे.

Gratitude
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

उदा. आई मी तुझी आभारी आहे! आभारी आहे !! आभारी आहे!!! कारण तू माझ्यासाठी छान जेवण बनवले. बालके दररोज अशी वाक्ये लिहून आनंद वाढवत आहेत. तसेच या कृतज्ञता वाक्यांमुळे त्यांचे शाळेतील भांडणाचे प्रमाण हळूहळू कमी होताना जाणवतेय. कारण ते शाळेतील प्रत्येक घटकाबाबत कृतज्ञता मानून त्याचे छानसे परिणाम अनुभवत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com