
Jalgaon News : गरिबांना मराठी नवीन वर्षाला महागाईची (Inflation) झळ नको, म्हणून राज्य शासनाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ (Anandach Shidha) (रवा, डाळ, साखर, तेल) देण्याचे जाहीर केले आहे. सोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) ‘आनंदाचा शिधा’ मिळेल.
त्यासाठी मात्र कार्डधारकांना रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
राज्य मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता.
हा ‘आनंदाचा शिधा’ देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदीसाठी ‘महाटेंडर्स’ या ऑनलाइन २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. काहींना दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळाला होता.
‘आनंदाचा शिधा’ पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. यामुळे ती पाकिटे परत मागविली होती, काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाला होता. यामुळे ‘आनंदाचा शिधा’ चांगलाच गाजला होता.
आता परत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कर्डधारकांना लाभ मिळणार आहे.
प्राधान्य गटात चार लाख ९० हजार ६४०, अंत्योदय एक लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण सहा लाख २४ हजार ९९७ कार्डधारकांना शिधा मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.