Agriculture, Education Guidance : आरोग्य, शिक्षण, कृषी विषयावर नंदुरबार येथील परिषदेत मार्गदर्शन

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस व लीडरशिप फॉर इक्विटी या स्वयंसेवी संस्थांतर्फे नंदुरबार येथे एकदिवसीय आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याने केलेले पथदर्शक प्रकल्प या विषयावर शैक्षणिक परिषद झाली.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Nandurbar Agriculture News : नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस व लीडरशिप फॉर इक्विटी या स्वयंसेवी संस्थांतर्फे नंदुरबार येथे एकदिवसीय आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात नंदुरबार जिल्ह्याने केलेले पथदर्शक प्रकल्प या विषयावर शैक्षणिक परिषद झाली.

परिषदेस नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे (दूरदृश्य प्रणाली), जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (दूरदृश्य प्रणाली), जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया (दूरदृश्य प्रणाली), सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की आदी उपस्थित होते.

Indian Agriculture
Minister Dr. Vijayakumar Gavit : शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन करा

परिषदेत नंदुरबार जिल्ह्यात अलीकडच्या काळात आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात राबविल्या गेलेल्या नावीन्यपूर्ण यशस्वी प्रकल्पांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण आणि कृषी या विषयावर परिसंवाद पार पडले.

यात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्यासंबंधी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी शिक्षणसंबंधी, तर कृषी विषयाशी संबंधित परिसंवादामध्ये वनमती, नागपूर प्रकल्पाच्या संचालक मिताली सेठी यांनी, तर महिला आणि बालविकास मंत्रालयांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखर यांनी सहभाग घेतला.

वरील तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रकल्प राबविणाऱ्या अधिकारी, शेतकरी, शिक्षक, अंगणवाडीसेविकांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले.

या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृश्य प्रणालीवरून मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Indian Agriculture
MPSC News : ठाण्‍यात ‘एमपीएससी’ मार्गदर्शन वर्ग सुरू होणार

...यांचा झाला गौरव

महिला व बालकल्याण : सारिका दादर (अंगणवाडी पर्यवेक्षक), बबिता पाडवी (अंणवाडीसेविका).

कृषी : रोशन बोरसे, योगेश पाटील, दिलीप पाडवी, धनराज पाडवी.

शिक्षण क्षेत्र : अनिता पाटील, निर्मल माळी, रूपाली गोसावी, राजेश भावसार.

आरोग्य क्षेत्र : डॉ. रोशनी पाटील, डॉ. हितेश सुगंधी, मनीषा पाडवी (परिचारिका), उषा ठाकरे (आशा नर्स), कृष्णा पावरा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com