Gujrat Election 2022 Live Update : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर; हिमाचलमध्ये मात्र कॉँग्रेस-भाजप काट्याची लढत

गुजरात विधानसभा २०२२ चे निकाल आज (८ डिसेंबर) रोजी जाहीर होत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे दिसते.
Gujrat Election 2022 Live Update
Gujrat Election 2022 Live UpdateAgrowon

गुजरात विधानसभा २०२२ चे (Gujrat Election 2022 Live Update) निकाल आज (८ डिसेंबर) रोजी जाहीर होत आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे दिसते. दीडशेच्या आसापास जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. ११ वाजेपर्यंत १५१ जागेवर भाजप आघाडीवर होता. त्यामुळे गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापनकडे वेगाने आगेकूच करत आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसचा मात्र साफडासुफ झाला.

११ वाजेपर्यंतचे आकडे पाहता कॉँग्रेस १९ आणि आप ८ जागेवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या आपचे गुजरातमधील पहिल्याच निवडणुकीत ८ जागेवर आघाडीवर असणेही महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे आपची गुजरातमधील ओपनिंग दमदार झाल्याचे मानले जात आहे.

गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ९२ जागावर विजय गरजेचा आहे. मात्र भाजपने सकाळच्या ११ वाजेपर्यंत १५१ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कॉँग्रेस आणि आपच्या लढतीत भाजपला फायदा झाल्याचे दिसते.

गुजरातमध्ये मागील २५ वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. मात्र पंजाब आणि दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या आपने या निवडणुकीत उडी मारली. त्यामुळे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजप आणि कॉँग्रेसमध्ये आपने उडी घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष आहे. मात्र भाजपने या निवडणुकीत अभूतपूर्व अशी आघाडी घेतलेली दिसत आहे. २०१७ मध्ये कॉँग्रेसने भाजपला ९९ जागेवर रोखले होते. मात्र यावेळीचे चित्र उलट दिसत आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करेल असं जवळपास स्पष्ट झाले आहे.

Gujrat Election 2022 Live Update
Wheat Market : गहू दर विक्रमी टप्पा गाठणार

गुजरातमधील ३३ जिल्ह्यांमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभासाठी मतदान पार पडले.

हिमाचल प्रदेश विधानसभा कल

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप आणि कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. ११ वाजेपर्यंतचे कल पाहत भाजप ३३ जागांवरच्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर कॉँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर आहे. आपला मात्र अजून खातेही उघडता आले नाही. तर ३ जागेवर आघाडीवर आहेत.

प्रत्येक पाच वर्षांनंतर हिमाचलमध्ये सत्ताबदल होते. त्यामुळे भाजप आणि कॉँग्रेसने आतापर्यंत ५-५ वर्षे हिमाचलमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. यंदा मात्र भाजप आणि कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत सुरू आहे. त्यामुळे अजूनतरी हिमाचल प्रदेशमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com