Crop Harvesting : खानदेशात पिकांची मळणी सुरूच

खानदेशात उशिरा संकरित पेरणीची ज्वारी, बाजरी व मका या पिकांची मळणी सुरूच आहे. मळणी आणखी १० ते १२ दिवस सुरूच राहील.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon

Jalgaon Farming News : खानदेशात उशिरा संकरित पेरणीची ज्वारी, बाजरी व मका या पिकांची मळणी सुरूच आहे. मळणी आणखी १० ते १२ दिवस सुरूच राहील. मजूरटंचाई व गारपीट, वादळी पावसाने मळणीत व्यत्यय येत आहे.

मका पिकाची मळणी अंतिम टप्प्यात आहे. ही मळणी गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरू आहे. आगाप पेरणीच्या आगाप लागवडीच्या मक्याची मळणी गेल्या १५ दिवसांपूर्वीच झाली. परंतु उशिरा पेरणीच्या मक्याची मळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. जानेवारीच्या मध्यात पेरणी केलेल्या बाजरीची व कांद्याची काढणी सुरूच आहे.

बाजरीची पेरणी खानदेशात जळगावमधील चोपडा, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांत अधिकची झाली होती. तर मक्याची लागवडदेखील खानदेशात यंदा मागील वर्षापेक्षा अधिक म्हणजेच सुमारे ३५ हजार हेक्टरवर झाली होती.

मक्याची लागवड विविध टप्प्यांत झाली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून मळणी, कापणी सुरू आहे. बाजरीची पेरणी डिसेंबर, जानेवारीत अनेकांनी केली आहे. तर मका लागवड नोव्हेंबर व डिेसेंबरमध्ये कमाल शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Crop Harvesting
Hailstorm Crop Damage : सोयगाव तालुक्यात पिकांना गारपिटीने पुन्हा झोडपले

काहांनी मका लागवड जानेवारीत देखील केली. मका मळणी एप्रिलच्या मध्यात सुरू वेगात सुरू झाली आहे. बाजरीची मळणीदेखील याच महिन्यात सुरू झाली आहे. कापणी, मळणीसाठी मजुरांची कमी आवश्यकता भासत आहे. उष्णता आहे.

तसेच पाऊस, वादळ आणि गारपीट अनेक भागांत झाली आहे. त्यामुळे मजुरांमध्ये भीती आहे. परंतु सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी बांधव मळणी, कापणीच्या कामासाठी चोपडा, जळगाव, शिरपूर, शहादा, धुळे, यावल आदी भागात पोचले आहेत.

या मंडळीची मोठी मदत या कामात होत आहे. या मंडळीमुळे मजूरटंचाई काहीशी कमीदेखील झाली आहे. परंतु या महिन्यात सुरुवातीपासून पाऊस, वादळाची समस्या असल्याने मळणी, कापणीत व्यत्यय येत आहे.

स्थानिक मजूर उष्णतेमुळे कापणीच्या कामासाठी येत नसल्याची स्थिती आहे. मळणी यामुळे लांबत असून, ती आणखी १० ते १२ दिवस सुरूच राहील, असे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com